Apology : पायल घोषची हायकोर्टासमोर माघार; ऋचा चड्ढाची बिनशर्त माफी

अभिनेत्री पायल घोषने मुंबई उच्च न्यायालयासमोर अभिनेत्री ऋचा चड्ढा हिची बिनशर्त माफी मागितली आहे

Apology : पायल घोषची हायकोर्टासमोर माघार; ऋचा चड्ढाची बिनशर्त माफी
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 6:09 PM

मुंबई : अभिनेत्री पायल घोषने मुंबई उच्च न्यायालयासमोर अभिनेत्री ऋचा चड्ढा हिची बिनशर्त माफी मागितली आहे. ऋचा चड्ढाच्या वकिलांनी या बातमीची पुष्टी केली आहे. तसेच ऋचाने पायलची माफी स्वीकारली आहे. ऋचा चड्ढाने मुंबई उच्च न्यायालयात पायलविरोधात मानाहानीचा खटला दाखल केला होता. त्यामुळे पायलला ऋचासमोर नमतं घ्यावं लागलं आहे. पायलच्या माफीमुळे तिने ऋचावरील आरोप खोटे ठरत आहेत. (Payal Ghosh tenders unconditional apology to Richa Chadda in Bombay high court)

पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर या प्रकरणात ऋचा चड्ढा हिचं नावही घेतलं होतं. त्यामुळे ऋचाने पायलविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर पायलचे वकील नितीन सातपुते म्हणाले होते की, “याप्रकरणी पायल ऋचा चड्ढाची माफी मागणार आहे”. त्याप्रमाणे आज पायलने हायकोर्टासमोर ऋचाची माफी मागितली आहे.

पायलने एका मुलाखतीदरम्यान ऋचा चड्ढाचे नाव घेतले होते. पायल म्हणाली होती की, “अनुराग कश्यप यांनी मला सांगितलं की ऋचासह अनेक अभिनेत्री त्याच्यासोबत कम्फर्टेबल झाल्या आहेत”. तसेच  ‘काही नट्या अनुरागसोबत काम करण्यासाठी वाट्टेल  ते करायला तयार असतात’, हा दावा करताना पायलने रिचासह माही गिल, हुमा कुरेशी या अभिनेत्रींचीही नावं घेतली होती. त्यावरुन ऋचाने पायलला सडेतोड प्रत्युत्तर दिलेच, त्याचबरोबर हायकोर्टात पायलविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.

सुरुवातीला ऋचाने पायलला कोर्टात खेचल्यानंतर पायलने हे प्रकरण राष्ट्रीय महिला आयोगाकडे नेले. पायलने त्यावेळी ऋचाची माफी मागण्यास नकार दिला. परंतु कोर्टासमोर पायलचे काहीही चालले नाही. उलट आज तिला ऋचाची माफी मागावी लागली.

पायल घोषकडून अनुराग कश्यपवर आरोप

‘अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा. ज्यामुळे या माणसाचे खरे रुप जगासमोर येईल. माझ्या या वक्तव्यामुळे मला धोका होऊन माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा’, असे ट्विट पायल घोषने (Payal Ghosh) काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटमध्ये टॅग करत आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. याशिवाय तिने पोलिस स्थानकात अनुरागविरोधात बलात्कार आणि लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती.

संबंधित बातम्या

Payal Ghosh | अनुराग विरोधात ठोठावले राष्ट्रीय महिला आयोगाचे दरवाजे, पायल घोष दिल्लीला रवाना!

पायल घोषविरोधात रिचा चढ्ढा कोर्टात, ठोकला 1.1 कोटींचा मानहानीचा दावा

Anurag Kashyap | अनुराग कश्यप खोटारडे, त्यांची नार्को टेस्ट करा, पायल घोषची मागणी

(Payal Ghosh tenders unconditional apology to Richa Chadda in Bombay high court)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.