AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 दिवसांत मोडला पूनम पांडेचा संसार, पतीने मारहाण केल्याने घेणार घटस्फोट

पूनम पांडेने पती सॅमविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली असून, आता तिने हे नाते तोडत, घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले आहे. (Poonam Pandey to divorce Sam Bombay)

14 दिवसांत मोडला पूनम पांडेचा संसार, पतीने मारहाण केल्याने घेणार घटस्फोट
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Sep 24, 2020 | 7:46 PM
Share

मुंबई : लग्नानंतर अवघ्या 13 दिवसानंतर पूनम पांडेने तिचा नवरा सॅम बॉम्बे याच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. हनिमूनसाठी गोव्याला गेलेल्या या जोडीमध्ये जोरदार भांडणे सुरू झाली आहेत. या दरम्यान पूनम पांडेने पती सॅमविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. आता तिने हे नाते तोडत, घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले आहे. (Poonam Pandey to divorce Sam Bombay)

मिळालेल्या माहितीनुसार, सॅम बॉम्बेने पूनमला इतकी मारहाण केली आहे की तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पूनमच्या तक्रारीवरून सॅमला अटक करण्यात आली होती. यानंतर काहीवेळाने त्याला जामीन देखील मिळाला आहे.

पतीने आपला विनयभंग केल्याचा आरोप करत पूनम पांडेने सोमवारी रात्री पोलिसात तक्रार दाखल केली होती. गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची धमकी पतीने दिल्याचा दावाही तिने केला होता. वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंगळवारी संध्याकाळी गोवा कोर्टाने सॅम बॉम्बे याची सुटका केली.

दक्षिण गोव्यातील कानाकोना गावात पूनम पांडे शूटिंग करत असलेल्या चित्रपटाच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याची माहिती आहे. त्यानंतर पूनमची वैद्यकीय तपासणी होणार आहे. पतीला चार दिवस पोलिसात हजेरी लावावी लागणार असून या काळात त्याला तक्रारदार पत्नी पूनम पांडेशी संपर्क साधता येणार नाही. (Poonam Pandey to divorce Sam Bombay)

पूनमची गुपचूप लग्नगाठ

बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत 11 सप्टेंबरला पूनमने लगीनगाठ बांधली होती. फारसा गाजावाजा न करता पूनम गुपचूप लग्नाच्या बोहल्यावर चढली. पूनम आणि सॅम या दोघांनी लग्न समारंभातील फोटो आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले.

46 वर्षीय सॅम अहमद बॉम्बे हा चित्रपट दिग्दर्शक आहे. तर पूनम पांडेने काही चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. मॉडेल पूनम पांडे सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. बर्‍याचदा हॉट फोटो आणि व्हिडिओंमुळे ती चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.

पूनमने लग्नात एम्ब्रॉयडरी असलेला नेव्ही ब्लू लेहेंगा घातला होता. कपाळावर मोठा मांगटिका आणि हातात कलिरेही दिसत आहे. सॅमने तिला साजेशी रंगसंगती असलेला शेरवानी परिधान केला होता. जुलैमध्ये दोघांनी आपली एंगेजमेंट झाल्याचे जाहीर केले होते. सॅमने अंगठ्या दाखवताना त्यांचे फोटो शेअर केले होते.

संबंधित बातम्या : 

Poonam Pandey | मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे ‘या’ दिग्दर्शकासोबत लग्नाच्या बेडीत

मॉडेल पूनम पांडेला अटक, BMW कारही जप्त

(Poonam Pandey to divorce Sam Bombay)

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ