Poonam Pandey | मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे ‘या’ दिग्दर्शकासोबत लग्नाच्या बेडीत

Poonam Pandey | मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे 'या' दिग्दर्शकासोबत लग्नाच्या बेडीत

जुलैमध्ये आपली एंगेजमेंट झाल्याचे अभिनेत्री पूनम पांडेने जाहीर केले होते.

अनिश बेंद्रे

|

Sep 11, 2020 | 5:30 PM

मुंबई : बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणारी मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे लग्नाच्या बेडीत अडकली. बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत तिने लगीनगाठ बांधली. फारसा गाजावाजा न करता पूनम गुपचूप लग्नाच्या बोहल्यावर चढली. (Model Actress Poonam Pandey marries boyfriend Sam Bombay)

पूनम आणि सॅम या दोघांनी लग्न समारंभातील फोटो आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. 46 वर्षीय सॅम अहमद बॉम्बे हा चित्रपट दिग्दर्शक आहे. तर पूनम पांडेने काही चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे.

मॉडेल पूनम पांडे सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. बर्‍याचदा हॉट फोटो आणि व्हिडिओंमुळे ती चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.

पूनमने वधूचा वेष परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत. “तुझ्यासोबत सात जन्म घालवण्याची उत्सुकता आहे” असे कॅप्शन तिने फोटोला दिले आहे.

View this post on Instagram

Here’s looking forward to seven lifetimes with you.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

पूनमने लग्नात एम्ब्रॉयडरी असलेला नेव्ही ब्लू लेहेंगा घातला होता. कपाळावर मोठा मांगटिका आणि हातात कलिरेही दिसत आहे. सॅमने तिला साजेशी रंगसंगती असलेला शेरवानी परिधान केला होता. (Model Actress Poonam Pandey marries boyfriend Sam Bombay)

View this post on Instagram

❤️

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

जुलैमध्ये दोघांनी आपली एंगेजमेंट झाल्याचे जाहीर केले होते. सॅमने अंगठ्या दाखवताना त्यांचे फोटो शेअर केले होते.

दरम्यान, मे महिन्यात मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोघांवर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पूनम आणि सॅम बीएमडब्ल्यूमध्ये फिरत होते, ती गाडी जप्त करण्यात आली होती, तर दोघांना ताब्यात घेतल्यानंतर समज देऊन सोडण्यात आले. (Model Actress Poonam Pandey marries boyfriend Sam Bombay)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें