मॉडेल पूनम पांडेला अटक, BMW कारही जप्त

मॉडेल पूनम पांडेला अटक, BMW कारही जप्त
Poonam Pandey

संचारबंदी मोडून 'बीएमडब्ल्यू' कार चालवताना पूनमला मरीन ड्राइव्ह पोलिसांनी बेड्या ठोकल्या. (Model Poonam Pandey Arrested)

अनिश बेंद्रे

|

May 11, 2020 | 8:27 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिला अटक करण्यात आली आहे. ‘कोरोना’च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पूनमविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला. (Model Poonam Pandey Arrested)

आलिशान ‘बीएमडब्ल्यू’ कार चालवताना पूनमला मरीन ड्राइव्ह पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पूनम आपल्या मित्रसोबत विनाकारण भटकंती करत असल्याचा आरोप आहे. तिचा मित्र साम अहमदलाही पोलिसांनी अटक केली आहे.

पूनम पांडेची गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. तिच्याविरोधात राष्ट्रीय आपत्ती कायद्याच्या कलम 188, 269 आणि 51 ब अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मॉडेल पूनम पांडे सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. बर्‍याचदा हॉट फोटो आणि व्हिडिओंमुळे ती चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. (Model Poonam Pandey Arrested)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें