AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही लोकप्रिय अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अभिनेत्री अहानला डेट करत असल्याच्या चर्चा

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी या लोकप्रिय अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. दोघांनीही त्यांचे नाते खाजगी ठेवले आहे. त्यामुळे आता चाहत्यांनाही हीच उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे ही अभिनेत्री सुनील शेट्टीची सून होणार का, अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.

ही लोकप्रिय अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अभिनेत्री अहानला डेट करत असल्याच्या चर्चा
Jia Shankar Dating rumors with Ahan ShettyImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 08, 2025 | 5:59 PM
Share

बॉलीवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्री, असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे रिलेशनशिपमध्ये असूनही ते खूप खाजगी ठेवतात. त्यांना त्यांचे रिलेशनशिप सार्वजनिक करायला आवडत नाही. त्यापैकी एक आहे अहान शेट्टी. अहान शेट्टीचे नाव एका अभिनेत्रीशी जोडले जात आहे. डेटींगवरून सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. एक लोकप्रिय अभिनेत्रीला सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीला डेट करत असल्याचे वृत्त आहे. तथापि, त्यांनी त्यांचे नाते खूप खाजगी ठेवल्याचं म्हटलं जात आहे.

सुनील शेट्टीचा लेक अहान शेट्टी करतोय या अभिनेत्रीला डेट?

दरम्यान ही अभिनेत्री एक टिव्ही अभिनेत्री असून तिने एक प्रसिद्ध मराठी चित्रपटही केला आहे. सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसोबत ज्या अभिनेत्रीच्या अफेअरच्या बातम्या पसरत आहे ती अभिनेत्री म्हणजे जिया शंकर आहे. जिया शंकर गेल्या काही काळापासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. तथापि, ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते आणि चाहत्यांना तिच्या कामांबद्दल अपडेट देत राहते.

दोघांनीही त्यांच्या नात्यावर अद्याप तरी पुष्टी केलेली नाही 

आजकाल अशी चर्चा आहे की जिया शंकर अहान शेट्टी एकमेकांच्या प्रेमात आहे. तथापि, दोघांनीही याबद्दल सध्या तरी काहीही स्पष्टता दिलेली नाही. जिया शंकर सध्या परदेशात सुट्टीवर आहे. अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये तिच्या प्रियकराचा अनेक वेळा उल्लेख केला आहे. पण त्याची ओळख मात्र गुपित ठेवली आहे. सुट्टीत ती कोणासोबत होती हे तिने कधीही उघड केले नाही. त्यामुळे आता हे नातं शेवटपर्यंत गेलं तर नक्कीच जिया सुनील शेट्टीची सून होणार असं म्हणायला हरकत नाही.

अहानने अभिनेत्रीआधी तान्या श्रॉफला केलंय डेट

तथापि, तिने लग्नात रस नसल्याचं देखील एकदा म्हटलं होतं. आता जिया शंकर आणि अहान शेट्टीच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आहेत. त्यामुळे चाहत्यांना देखील या दोघांच्या नात्याबद्दल तेवढीच उत्सुकता असल्याचं म्हटलं जातं. तर अहानने याआधी तान्या श्रॉफला डेट केल्याचंही म्हटलं जातं. पण आता त्याचं नाव हे जियासोबत जोडलं जात आहे. जिया अनेक लोकप्रिय शो व्यतिरिक्त बिग बॉस ओटीटी 2 मध्ये देखील दिसली आहे. शोमध्ये अभिनेत्रीचे नाव अभिषेक मल्हानशी जोडले गेले होते, परंतु दोघांनीही एकमेकांचे ते फक्त चांगले मित्र असल्याचं सांगितलं आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.