Pranit More : ‘लोकांना अश्लील जोक्सच…’, काय म्हणालेला प्रणित मोरे? 370 रुपयांची बिर्याणी, मृतदेहांचे प्रायव्हेट पार्ट… अडचणीत मोठी वाढ

Pranit More : 370 रुपयांची बिर्याणी, मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टवर नको त्या जोक्समुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला प्रणित मोरे... प्रणित मोरे याच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला असून अश्लील जोक्सवर त्याने केलेलं वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.

Pranit More : लोकांना अश्लील जोक्सच..., काय म्हणालेला प्रणित मोरे? 370 रुपयांची बिर्याणी, मृतदेहांचे प्रायव्हेट पार्ट... अडचणीत मोठी वाढ
प्रणित मोरे
| Updated on: Jun 13, 2026 | 8:25 AM

Pranit More : ‘बिग बॉस 19’ नंतर प्रसिद्धी झोतात आलेला प्रणित मोरे आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. प्रणित मोर याच्या लाईव्ह शोमध्ये वादग्रस्त जोक्सनंतर त्याला माफी देखील मागावी लागली. 370 रुपयांच्या बिर्याणीच्या बदल्यात महिलेकडून तरुणीकडून केलेली मागणी आणि त्यानंतर डॉक्टर असलेल्या तरुणीने मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टवर केलेल्या जोक्समुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ देखील सर्वत्र व्हायरल होत आहेत. ज्यामुळे आता प्रणित मोरे याच्या विरोधात FIR देखील दाखल करण्यात आला आहे. सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा प्रणित मोरे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. याआधी त्याने वीर पहाडिया याच्यावर कमेंट केलेली. ज्यामुळे त्याच्यावर हल्ला देखील झालेला.

एवढंच नाही तर, प्रणित मोरे याने अनेक सेलिब्रिटींवर देखील वादग्रस्त वक्तव्य केली आहे. ज्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात देखील अडकलेला. पण आता चूक फक्त प्रणित मोरे याची नसून, शोमध्ये आलेल्या प्रेक्षकांची देखील आहे. काही दिवसांपूर्वी प्रणित, भारती सिंग हिच्या पॉडकास्टमध्ये आलेला. तेव्हा प्रणित याने लाईव्ह ऑडियंसबद्दल एक गोष्ट सांगितली होती. ‘मी कधीच स्क्रिप्ट तयार करत नाही. ज्याप्रमाणे मी माझ्या मित्रांसोबत बोलतो, त्याच प्रमाणे मी माझ्या ऑडियंससोबत देखील बोलतो. कारण तो कंटेंट युट्यूबवर प्रसारित होतो. जो 18 वर्षांपुढील दर्शक पाहू शकतात. पण जेव्हा मी टीव्हीसमोर असतो, तेव्हा खूप विचार करुन बोलतो…’

पुढे भारती हिने विचारलं सेक्स आणि अश्लील जोक्सवर लोकांना अधिक हसायला येतं. यावर प्रणित म्हणाला, ‘लोकांना हेच सर्व ऐकायला आवडतं. लोक कायम मला विचारतात असं का बोलतोस? पण खरं तर लोकांना तेच जास्त आवडतं… एकदा अश्लील शोच्या नावाने एक एपिसोड तयार केलेला. ज्यामध्ये चेतावनी देखील आलेली की, यामध्ये वल्गर जोक्स आहे.. पण त्याच व्हिडीओला सर्वात जास्त व्ह्यूज मिळाले होते…’

एवढंच नाही तर, अभिनेता सलमान खान याने देखील प्रणित मोरे याला चेतावनी दिली होती. बिग बॉस शोच्या दरम्यान, आता असे जोक्स करणार नाही… असं देखील प्रणित म्हणालेला. आता याच अश्लील जोक्समुळे प्रणित मोरे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की, याप्रकरणी पुढे काय होणार आहे.

Follow Us