AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prem Kitanu Movie Review: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा ‘प्रेम किटाणू’ सिनेमा प्रदर्शित, काय आहे सिनेमाची कथा

Prem Kitanu Movie Review: ‘प्रेम कीटाणु’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात माजी मुख्यमंत्र्यांचा नातू दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

Prem Kitanu Movie Review: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा 'प्रेम किटाणू' सिनेमा प्रदर्शित, काय आहे सिनेमाची कथा
प्रेम किटाणूImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 2:10 PM
Share

सिनेमागृहांमध्ये वीर पहारियाचा कॉमेडी सिनेमा ‘प्रेम कीटाणु’ रिलीज झाला आहे. कॉलेज लाइफवर आधारित या चित्रपटात प्रेम, मैत्री, कुटुंब आणि हलक्याफुलक्या कॉमेडीचा तडका आहे. चित्रपटात वीर पहारियासोबत आफिया सैयद आणि अपारशक्ती खुराणाही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपट कसा आहे? त्याच्या कथेत काय खास आहे आणि कलाकारांचा अभिनय कसा आहे? चला जाणून घेऊया…

बनारसच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अॅडमिशन दरम्यान विशाल (वीर पहारिया) आणि सुहानी (आफिया सैयद) पहिल्यांदा भेटतात. दोघे एकमेकांना चार वर्षे सिंगल राहण्याचा शाप देतात. शिक्षणानंतर दोघांचे आयुष्य पूर्णपणे बदललेले असते. सुहानी एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगली नोकरी मिळवून आपल्या करिअरमध्ये स्थिरावते. तर कॉलेजच्या दिवसांत दिल तुटल्यामुळे आणि निष्काळजीपणामुळे विशाल आयुष्यात मागे पडतो. विशाल आता अमेरिकेला जाऊन पुढील शिक्षण घेऊ इच्छितो, पण त्याच्यासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे पैशांची सोय करणे. याच निमित्ताने त्याची पुन्हा एकदा सुहानीशी भेट होते.

यावेळी दोघांमध्ये जुनी कटुता मागे पडून प्रेमाची भावना निर्माण होऊ लागते. पण कथेत नवीन ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा सुहानीचा बॉस रंजीत म्हणजे अपारशक्ती खुराणाची एंट्री होते आणि दोघांच्या आयुष्यात लव्ह ट्रायंगल सुरू होते. आता प्रश्न आहे की, विशाल आणि सुहानी आपले जुने रुसवे फुगवे विसरून एकमेकांच्या जवळ येऊ शकतील का? त्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागणार आहे.

अभिनयाविषयी

वीर पहारिया विशालच्या भूमिकेत सहज आणि चुलबुल्या अंदाजात दिसत आहे. भावनात्मक दृश्यांतही त्याचा अभिनय स्वाभाविक वाटतो. यापूर्वी ते ‘स्काय फोर्स’ चित्रपटात दिसला होता, जो व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकला नाही. या चित्रपटात त्याचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळतो. त्याची चांगली बाब म्हणजे तो सर्व प्रकारच्या भूमिका करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आफिया सैयदने आपल्या डेब्यू चित्रपटात सुहानीची भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री चित्रपटाच्या रोमँटिक भागाला मनोरंजक बनवते.

अपारशक्ती खुराणाचे नाव ऐकताच अपेक्षा असते की तो काही मजेशीर नक्की करेल. चित्रपटातही त्याचा अंदाज तसाच आहे. तो रंजीतच्या भूमिकेत कॉमेडीचा रंग भरतो. त्याची उपस्थिती अनेक दृश्ये मजेशीर बनवते. राकेश बेदीसह इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे.

चित्रपटाचे संगीत

चित्रपटातील गाणी चांगली आहेत. ‘कहो तो’, ‘तू मेरा रइयो’ आणि ‘इश्क का गुलाम’ यांसारखी गाणी चित्रपटाला आणखी मनोरंजक बनवतात. ही गाणी चित्रपटाला कंटाळवाणा होण्यापासून वाचवतात. कधी गाणी रोमान्सला पुढे नेतात, तर कधी कथेतील मस्ती कायम ठेवतात.

दिग्दर्शन आणि लेखन

अपूर्व सिंह कार्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ते यापूर्वी ‘सिर्फ एक बंदा काफी है’, ‘भैया जी’ आणि ‘एस्पिरेंट्स’च्या दोन्ही सिझनचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. याची कथा दीपक किंगरानी यांनी लिहिली आहे. दोघांनी मिळून अशी फिल्म बनवली आहे जी फन वॉच म्हणून पाहता येईल. चांगली बाब म्हणजे त्यांनी कथेला व्यर्थ लांबवलेले नाही. चित्रपटाचा रनटाइम २ तास १८ मिनिटे आहे. मात्र, अशा प्रकारच्या कथा यापूर्वीही अनेक चित्रपटांत दिसल्या गेल्या आहेत.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित पवारांना थेट सवाल!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू