AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 दिवसांपूर्वीच रचला हल्ल्याचा कट, 45 मिनिटं मैदानाबाहेर अन्…, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा थरारक घटनाक्रम उघड. फुटबॉल मैदानाबाहेर 45 मिनिटे वाट बघत बसले होते हल्लेखोर. हल्ला केल्यानंतर कुठे जाणार होते? वाचा सविस्तर

10 दिवसांपूर्वीच रचला हल्ल्याचा कट, 45 मिनिटं मैदानाबाहेर अन्..., टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 19, 2026 | 3:52 PM
Share

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील कथित गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या सूत्रांनुसार, आरोपींनी या हल्ल्याची पूर्वनियोजित तयारी केली होती. टायगरच्या दिनक्रमावर लक्ष ठेवून तो दर रविवारी जुहू येथील फुटबॉल मैदानावर खेळण्यासाठी जात असल्याची माहिती त्यांनी मिळवली होती. त्यामुळे हल्ल्याच्या दिवशी आरोपी मैदानाबाहेर सुमारे 45 मिनिटे आधीच पोहोचले होते आणि अभिनेत्याच्या बाहेर येण्याची वाट पाहत होते.

18 ऑक्टोबरला नेमके काय घडले?

सायंकाळी 5 वाजता : टायगर श्रॉफ फुटबॉल खेळण्यासाठी जुहू येथील मैदानावर पोहोचला.

सायंकाळी 6.15 वाजता : तीन आरोपी मैदानाबाहेर पोहोचून टायगर बाहेर येण्याची वाट पाहत असल्याची माहिती समोर आली.

सायंकाळी 7 वाजता : फुटबॉल खेळून मैदानाबाहेर आल्यानंतर टायगरने चाहत्यांसोबत सेल्फी घेतली आणि त्यानंतर तो आपल्या कारमध्ये बसला.

सायंकाळी 7.05 वाजता : टायगरची कार मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच दोन हल्लेखोरांनी कारवर सात गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ते तिसऱ्या साथीदारासह दुचाकीवरून फरार झाले. यातील एका हल्लेखोराने टायगरला, तर दुसऱ्याने त्याच्या चालकाला लक्ष्य केल्याचा प्राथमिक दावा आहे.

सायंकाळी 7.10 वाजता : गोळीबारात एक चाहता जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सायंकाळी 7.30 वाजता : टायगरने चालकाला ड्रायव्हिंग सीटवरून बाजूला करून स्वतः कार चालवत नानावटी रुग्णालय गाठल्याचे सांगितले जाते.

रात्री 10 वाजता : लॉरेन्स गँगशी संबंधित अनिल पंडित याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला.

रात्री 11.30 वाजता : घटनेनंतर टायगर श्रॉफच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली.

रात्री 11,40 वाजता : मुंबई पोलीस टायगरला त्याच्या घरी घेऊन पोहोचल्याचे सांगण्यात आले.

आरोपींचा नेमका पळून जाण्याचा प्लॅन काय होता?

प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी रेल्वेने जयपूरपर्यंत जाण्याची योजना आखली होती. त्यानंतर बसने दिल्ली गाठून रस्तेमार्गे नेपाळच्या सीमेतून देशाबाहेर पळून जाण्याचा त्यांचा कथित प्रयत्न होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी कोटा येथे त्यांना पकडल्याची माहिती समोर आली.

Follow Us
टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्
Tiger Shroff Case : टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट समोर; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्.....
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी...
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; फोन करणारा कोण?
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट गणेश नाईकांकडे धाव
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात...
Manoj Jarange : Dasara Melava : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, जरांगे पाटील उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचं लक्ष
टायगर श्रॉफला भेटले मात्र...; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
Ram Purneker On Tiger Shroff Car : टायगर श्रॉफला भेटले मात्र आमच्यासाठी वेळ नाही; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी...
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान;
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान; म्हणाले...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी हतबल
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी