AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kriti Sanon: माफ करा, माझी मुलंही असे कपडे घालतात पण..; क्रिती सनॉनच्या जाहिरातीवर प्रियांका चोप्राची आई स्पष्टच बोलली..

Kriti Sanon Ad: क्रिती सनॉनच्या रक्षाबंधनच्या जाहिरातीवर आता अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी रोखठोक मत व्यक्त केलं आहे. रक्षाबंधनच्या जाहिरातीत तोकडे कपडे घातल्याने क्रिती सनॉन तुफान ट्रोल झाली.

Kriti Sanon: माफ करा, माझी मुलंही असे कपडे घालतात पण..; क्रिती सनॉनच्या जाहिरातीवर प्रियांका चोप्राची आई स्पष्टच बोलली..
प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा, क्रिती सनॉनImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 28, 2026 | 11:29 AM
Share

अभिनेत्री क्रिती सनॉनच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद अद्याप थांबलेला नाही. जाहिरातीतील क्रितीच्या पोशाखावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. काहींनी हा पोशाख पारंपरिक सणासाठी योग्य नसल्याचं म्हटलं, तर क्रितीने महिलांच्या कपड्यांवरून त्यांचे संस्कार आणि संस्कृती मोजण्याला विरोध केला. आता या वादात अभिनेत्री प्रियंका चोप्राची आई मधू चोप्रा यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात माध्यमांनी मधू चोप्रा यांनाना क्रितीच्या जाहिरातीबाबत प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी महिलांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याला पूर्णपणे नाकारलं नाही. मात्र, स्वातंत्र्यासोबत काही मर्यादा आणि प्रसंगाचं भानही महत्त्वाचं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाल्या मधू चोप्रा?

“माय बॉडी, माय चॉइस (माझं शरीर, माझी निवड) ही भूमिका योग्य आहे. मात्र त्यासोबत स्वाभिमान, प्रतिष्ठा आणि इतरांच्या मूल्यांचा आदर असणंही गरजेचं आहे. एखादा पोशाख ज्या ठिकाणी किंवा ज्या प्रसंगी सामान्य मानला जातो, तिथे तो योग्य ठरू शकतो. मात्र प्रत्येक प्रसंगासाठी एकच नियम लागू करता येत नाही,” असं त्या म्हणाल्या. मधू चोप्रा यांनी यावेळी त्यांच्या कुटुंबाचाही संदर्भ दिला. “माफ करा पण माझ्या मुलांनीही आधुनिक किंवा असे कपडे घातले आहेत, मात्र कामासाठी किंवा आवडीनुसार कपडे निवडताना प्रसंग आणि वातावरणाचा विचार केला जातो,” असं त्यांनी सांगितलं.

त्यांनी पुढे कपड्यांच्या ‘aesthetic’ म्हणजेच सौंदर्यपूर्ण मांडणीवरही भाष्य केलं. त्यांच्या मते एखादा लूक प्रसंगाला साजेसा आणि सौंदर्यपूर्ण असेल तर तो सहज स्वीकारला जातो. मात्र या जाहिरातीतील पोशाख सणाच्या संदर्भात योग्य वाटला नाही, म्हणून त्यावर टीका झाली असावी, असा त्यांचा सूर होता.

क्रिती सनॉनची प्रतिक्रिया

दरम्यान, या वादावर क्रिती सनॉननेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली होती. रक्षाबंधनाचा खरा अर्थ कपड्यांमध्ये नसून भावना आणि नात्यात आहे, असं तिने म्हटलं होतं. तिने महिलांना काय घालावं हे सांगण्याची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचंही सांगितलं. तिच्या मते, काळानुसार एथनिक फॅशन बदलली आहे; त्यामुळे एखाद्या महिलेच्या कपड्यांवरून तिच्या संस्कृतीबद्दल आदर ठरवणं योग्य नाही.

हटवली जाहिरात

या वादानंतर ज्वेलरी ब्रँड GIVA ने संबंधित जाहिरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवली. ब्रँडने भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचा आदर करत असल्याचं सांगितलं. जाहिरातीमुळे समाजातील काही घटकांच्या भावना दुखावल्या असतील तर तो आपला हेतू नव्हता, असंही ब्रँडने स्पष्ट केलं.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,