10 वी पास, गावातल्या लग्नात गायचा गाणी, 1720000000 कोटी संपत्तीचा मालक आहे हा गायक
गावातील लग्नात गाणी गाणारा हा गायक आज आहे कोट्यांवधींचा मालक. प्राइवेट जेटसह भारत आणि विदेशात आहे अलिशान घर.

Punjabi Singer : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही गायक आहेत. ज्यांची गाणी प्रेक्षक प्रचंड आवडीने ऐकतात. त्याचबरोबर काही प्रेक्षक हे पंजाबी गाण्याचे देखील चाहते आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पंजाबी इंडस्ट्रीमधील सर्वात श्रीमंत गायकाबद्दल सांगणार आहोत.
पंजाबी संगीतसृष्टीतील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय गायक म्हणून दिलजीत दोसांझचे नाव आघाडीवर घेतले जाते. दिलजीत केवळ पंजाबी इंडस्ट्रीपुरता मर्यादित नाही तर त्याने आपल्या गाण्यांच्या जोरावर देश-विदेशात देखील मोठी लोकप्रियता मिळवली आहे. त्याच्या गाण्यांचा जादूई प्रभाव असा असतो की तो जेव्हा स्टेजवर येतो तेव्हा काही मिनिटांतच संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून जाते. त्याच्या दमदार आवाजावर आणि दमदार परफॉर्मन्सवर प्रेक्षक अक्षरशः थिरकताना दिसतात.
दिलजीत दोसांझ हा पंजाबी इंडस्ट्रीमधील सर्वात महागडा आणि प्रसिद्ध गायकांपैकी एक मानला जातो. त्याने 2002 साली त्याचा पहिला म्युझिक अल्बम रिलीज करून संगीत कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याने एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली. आज त्याची गाणी केवळ पंजाबमध्येच नाही तर संपूर्ण भारतात आणि परदेशातही तितकीच लोकप्रिय आहेत.
दिलजीत दोसांझची संपत्ती
गायनासोबतच दिलजीत दोसांझने अभिनय क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने अनेक पंजाबी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असून त्याच्या अभिनयाचेही मोठ्या प्रमाणात कौतुक झाले आहे. मेहनत आणि सातत्यच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे मजबूत स्थान निर्माण केले आहे.
View this post on Instagram
दिलजीत दोसांझच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर आकडे ऐकून कुणालाही आश्चर्य वाटू शकते. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार दिलजीत दोसांझची एकूण संपत्ती सुमारे 172 कोटी रुपये इतकी आहे. इतकेच नाही तर दिलजीत दोसांझकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. तसेच भारतासोबतच अमेरिकेत देखील एक आलिशान डुप्लेक्स घर आहे.
साध्या कुटुंबातून यशाच्या शिखरापर्यंत
दिलजीत दोसांझचा जन्म पंजाबमधील एका छोट्या गावात झाला. तो एका साध्या कुटुंबातून आला असून आपल्या कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर त्याने आज हे यश मिळवले आहे. एकूणच, दिलजीत दोसांझची संपत्ती आणि त्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात असून त्याच्या गाण्यांवर आजही कोट्यवधी चाहते थिरकताना आणि प्रेम करताना दिसतात. पंजाबी इंडस्ट्रीमध्ये त्याचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.
