AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहिद कपूरच्या ‘ओ रोमियो’मध्ये प्रसिद्ध मराठी गायकाने साकारला इन्स्पेक्टर पठारे; पहिल्यांदाच धरली बंदूक

शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो' या चित्रपटातून एका प्रसिद्ध मराठी गायकाने विशेष छाप सोडली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. यामध्ये त्यांनी इन्स्पेक्टर पठारेंची भूमिका साकारली आहे.

शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो'मध्ये प्रसिद्ध मराठी गायकाने साकारला इन्स्पेक्टर पठारे; पहिल्यांदाच धरली बंदूक
Rahul DeshpandeImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 23, 2026 | 1:37 PM
Share

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओ रोमियो’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची कथा गँगस्टर हुसैन उस्ताराच्या आयुष्यावर आधारित आहे. शाहिद कपूर, नाना पाटेकर, तृप्ती डिमरी, फरीदा जलाल यांसारख्या भूमिकांदरम्यान आणखी एका कलाकाराने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. चित्रपटात इन्स्पेक्टर जयंत पठारेची भूमिका साकारलेला हा कलाकार दुसरा-तिसरा कोणी नसून प्रसिद्ध मराठी गायक राहुल देशपांडे आहेत. ‘ओ रोमियो’ या चित्रपटातून राहुल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अभिनयक्षेत्रात जरी ते नवीन असले तरी संगीत क्षेत्रात मात्र राहुल देशपांडे हे प्रख्यात नाव आहे. त्यांनी याआधी काही मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ते प्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांचे नातू आहेत. ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला आहे.

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत राहुल म्हणाले, “विशाल सरांनी ठरवलं होतं की माझी भूमिका थोडी वेगळी आणि मजेशीर असेल. पठारेची भूमिका एखादा अभिनेता साकारू शकला असता, परंतु त्यांनी संगीताच्या पार्श्वभूमीमुळे माझी निवड केली.” राहुल यांनी पुढे असंही सांगितलं की त्यांनी मुंबई लोकल ट्रेनमध्ये नाना पाटेकर आणि शाहिद कपूर यांच्यासोबत एक महत्त्वाचा सीन शूट केला होता. विशेष म्हणजे याआधी कधीच हातात बंदूक न घेतलेल्या राहुल देशपांडे यांनी इन्स्पेक्टर पठारेच्या भूमिकेसाठी पहिल्यांदाच बंदुकीला स्पर्श केला होता. शूटिंगच्या आधी मला प्रशिक्षण देण्यात आलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी राहुल यांनी नाना पाटेकरांसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता, याविषयीही सांगितलं. “चित्रपटात माझे बहुतांश सीन्स हे नानांसोबतच होते. सेटवर ते माझ्याशी अत्यंत सहजतेने वागले आणि संपूर्ण शूटिंगदरम्यान त्यांनी माझी साथ दिली. नानांनी मला सांगितलं होतं की मी त्यांच्या प्रतिक्रियांकडे लक्ष द्यावं आणि त्या हिशोबाने त्यांना उत्तर द्यावं, बाकी सगळं ते सांभाळून घेतील. खरं सांगायचं झालं तर त्यांनी या सीनचा प्रभाव वाढवण्यासाठी काही गाण्यांचाही सल्ला दिला, जो विशाल सरांना खूप आवडला होता”, असं ते पुढे म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...