AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने जगभरात रचला इतिहास; पटकावलं पहिलं स्थान

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या कमाईची घोडदौड सुरूच आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाने आतापर्यंत किती कोटी रुपये कमावले, ते जाणून घ्या..

Raja Shivaji : 'राजा शिवाजी' चित्रपटाने जगभरात रचला इतिहास; पटकावलं पहिलं स्थान
Raja shivaji box office collection Image Credit source: Instagram
| Updated on: May 19, 2026 | 8:58 AM
Share

बॉक्स ऑफिसवर दर आठवड्यात नवनवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत, तरी रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट आपलं वर्चस्व टिकवून आहे. अगदी नवीन प्रदर्शित झालेले चित्रपटसुद्धा या ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटाला मागे टाकू शकलेले नाहीत. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून हा चित्रपट दररोज बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. आता 18 व्या दिवशीही दमदार कमाई करत ‘राजा शिवाजी’ हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा मराठी चित्रपट बनून इतिहास रचला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’लाही मागे टाकलं आहे.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दोन आठवड्यांतही चांगली कमाई केली होती. तर तिसऱ्या वीकेंडला अनेक नवीन चित्रपटांशी स्पर्धा असूनही या चित्रपटाने केवळ दमदार कामगिरीच केली नाही, तर त्याच्या कमाईतही मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. 11.35 कोटी रुपयांनी ओपनिंग केलेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात कमाईचा 50 कोटींचा टप्पा ओलांडला होता. पहिल्या आठवड्यात 57.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात त्यात 27 कोटी रुपयांची भर पडली. त्यानंतर या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पंधराव्या दिवशी 1.70 कोटी रुपये, सोळाव्या दिवशी 2.90 कोटी रुपये आणि सतराव्या दिवशी 3.80 कोटी रुपये कमावले. आता ‘सॅकनिल्क’च्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनाच्या अठराव्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या सोमवारी 1.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा भारतातील 18 दिवसांतील नेट कलेक्शनचा आकडा आता 94.25 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दहा वर्षांपूर्वी 2016 मध्ये ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत जगभरात 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. आता दहा वर्षांनंतर ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक महाकाव्याने ‘सैराट’ला मागे टाकून आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनण्याचा मान मिळवला आहे. निर्मात्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने जगभरात 114.8 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसचे विक्रम मोडले आहेत. अजूनही हा चित्रपट थिएटरमध्ये सुरू आहे.

या चित्रपटाची निर्मिती मुंबई फिल्म कंपनी आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली जिनिलिया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. या ऐतिहासिक चित्रपटात रितेश आणि जेनेलिया मुख्य भूमिकेत असून त्यांच्यासोबत संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, विद्या बालन, अमोल गुप्ते यांच्यासह इतर कलाकारही आहेत.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....