AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : हर हर महादेव! ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची सर्वाधिक कमाई; रितेश देशमुखच्या नावावर सर्वांत मोठा रेकॉर्ड

अभिनेता रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाने नवा विक्रम रचला आहे. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला आहे. भारतातील ग्रॉस कलेक्शनचा आकडा 100 कोटी रुपयांच्या पार पोहोचला आहे.

| Updated on: May 18, 2026 | 3:52 PM
Share
जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' या चित्रपटाने देशांतर्गत आणि परदेशातही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. भारतात 93 कोटी रुपयांची निव्वळ आणि जगभरात 114.80 कोटी रुपयांची एकूण कमाई करून 'राजा शिवाजी' हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे.

1 / 5
ऐतिहासिक ओपनिंगसह विक्रमांची नोंद केल्यानंतर आणि पहिल्या दोन आठवड्यांत उल्लेखनीय सातत्य राखल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांना वाहिलेल्या या महाकाव्याला तिसऱ्या वीकेंडमध्येही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही आवृत्त्यांमध्ये मिळालेल्या उत्कृष्ट मौखिक प्रसिद्धी आणि कौतुकामुळे, चित्रपटाला प्रेक्षकांचा भक्कम प्रतिसाद मिळत आहे.

2 / 5
'राजा शिवाजी' या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 57.70 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 27 कोटी रुपये, प्रदर्शनाच्या पंधराव्या दिवशी 1.70 कोटी रुपये, सोळाव्या दिवशी 2.90 कोटी रुपये, सतराव्या दिवशी 3.80 कोटी रुपये कमावले. यासह भारतातील एकूण नेट कलेक्शनचा आकडा 93.10 कोटी रुपयांवर आणि ग्रॉस कलेक्शनचा आकडा 109.90 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

3 / 5
परदेशातही रितेश देशमुखच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाने परदेशात एकूण 4.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर जगभरातील एकूण कमाई 114.80 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तिसऱ्या आठवड्यातील दमदार कामगिरीमुळे 'राजा शिवाजी' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वपूर्ण ब्लॉकबस्टर यशस्वी चित्रपट म्हणून उदयास येत आहे.

4 / 5
'राजा शिवाजी' हा रितेशच्या करिअरमधील चौथा यशस्वी मराठी चित्रपट ठरला आहे. याआधी 'लय भारी', 'माऊली' आणि 'वेड' या त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. 'राजा शिवाजी' या चित्रपटाने मराठीतील 'सैराट'चा विक्रम मोडला आहे.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...