AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji: रितेशच्या ‘राजा शिवाजी’मध्ये सलमान खानची मोठी भूमिका; टीझरनंतर चर्चांना उधाण

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटात अभिनेता सलमान खान अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Raja Shivaji: रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची मोठी भूमिका; टीझरनंतर चर्चांना उधाण
राजा शिवाजी चित्रपटातील कलाकारImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 02, 2026 | 8:33 AM
Share

अभिनेता रितेश देशमुखने गेल्या दहा वर्षांपासून जे स्वप्न पाहिलं, ते अखेर सत्यात उतरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित त्याचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट येत्या 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे. रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, विद्या बालन, भाग्यश्री, बोमन इराणी, फरदीन खान, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर अशी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील तगडी स्टारकास्ट यात पहायला मिळतेय. या टीझरवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच अभिनेता सलमान खानच्या भूमिकेविषयी अनेकांनी कुतूहल व्यक्त केलं आहे.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटात सलमान खानसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. यासाठी त्याने 2025 मध्येच शूटिंग पूर्ण केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, तो या चित्रपटात जीवा महालाची भूमिका साकारणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धांमध्ये जीवा महाला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते महाराजांचे सर्वांत विश्वासू अंगरक्षक आणि मराठा सैन्यातील सर्वांत कुशल योद्धे होते. त्यामुळे सलमानला या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. टीझरमध्ये त्याची झलक दाखवण्यात आली नसली तरी त्याची ही भूमिका आणि एकंदर लूक कसा असेल, हे जाणून घेण्यासाठी प्रचंड कुतूहल व्यक्त होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा, दहा वर्षे एका महाकाय स्वप्नाला उराशी बाळगून ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. लक्षात आलं.. छत्रपती शिवाजी महाराज नावाचं हे आकाश जितकं दिसतं त्यापेक्षा कितीतरी भव्य आहे. आम्ही पाहिलेल्या स्वप्नाची पहिली झलक तुमच्यासमोर ठेवताना मला अभिमान वाटतो आहे. आपला राजा, आपला अभिमान. आई जगदंबेचं स्मरण करून मोहिमेचा पहिला भंडारा उधळत आहे,’ असं लिहित रितेशने हा टीझर पोस्ट केला आहे. काहींना हा टीझर खूप आवडला आहे, तर काहींनी त्यातील कलाकारांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचं भव्य चित्रण यात करण्यात आलं आहं. रितेश देशमुखनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका देखील साकारली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...