AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या चित्रपटापुढे ‘धुरंधर’फेल, 100 दिवस होता हाऊसफुल, त्यामधील गाण्याने लावलेले वेड, कमाईने निर्माते थक्क

सलग 17 चित्रपट हिट देणारा एकमेव अभिनेता. ज्याच्या 56 वर्षांपूर्वीच्या चित्रपटाने रचला इतिहास. 100 दिवस बॉक्स ऑफिसवर कब्जा. त्यावेळेची कमाई पाहून थक्क झालेले निर्माते.

या चित्रपटापुढे 'धुरंधर'फेल, 100 दिवस होता हाऊसफुल, त्यामधील गाण्याने लावलेले वेड, कमाईने निर्माते थक्क
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 05, 2026 | 11:53 AM
Share

Bollywood Biggest Blockbuster Movies: हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांनी आपल्या कारकिर्दीत एकाहून एक हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. सलग 17 हिट चित्रपट देण्याचा ऐतिहासिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. जो आजही अबाधित आहे. जवळपास 46 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 180 चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

आज आपण अशाच एका 56 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने हिंदी सिनेमाच्या इतिहासात अढळ स्थान मिळवले आहे. तो चित्रपट म्हणजे ‘आराधना’.

‘आराधना’ने बदलले राजेश खन्नांचे आयुष्य

1969 साली प्रदर्शित झालेला ‘आराधना’ हा चित्रपट राजेश खन्नांच्या करिअरला कलाटणी देणारा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांच्या सोबत दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर प्रमुख भूमिकेत होत्या. विशेष म्हणजे शर्मिला टागोर या आजच्या सुपरस्टार सैफ अली खान यांच्या आई आहेत.

चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळाले. प्रेक्षकांनी या चित्रपटाला इतके प्रेम दिले की तो सलग 100 दिवस सिनेमागृहात चालणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला. त्या काळात हा एक अभूतपूर्व विक्रम मानला जात होता.

डबल रोल आणि प्रेक्षकांची प्रचंड पसंती

‘आराधना’मध्ये राजेश खन्ना यांनी डबल रोल साकारला होता. त्यांनी एका एअरफोर्स पायलटची आणि त्यानंतर त्याच्या मुलाची भूमिका केली होती. या दोन्ही भूमिका त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारल्या. शर्मिला टागोर आणि राजेश खन्ना यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली आणि ही जोडी आजही हिंदी सिनेमातील सर्वोत्तम जोड्यांपैकी एक मानली जाते.

या ब्लॉकबस्टर चित्रपटाला 19 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘बेस्ट फिल्म’चा मान मिळाला. तसेच, शर्मिला टागोर यांना त्यांच्या दमदार अभिनयासाठी ‘बेस्ट अभिनेत्री’चा पुरस्कार देण्यात आला.

कमी बजेट, प्रचंड कमाई

मिळालेल्या माहितीनुसार, ‘आराधना’ चित्रपट फक्त 58 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, या चित्रपटाने जगभरात सुमारे 17 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्या काळातील ही कमाई ऐतिहासिक मानली जाते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...