AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला पुन्हा जेलमध्ये पाठवा.. म्हणणाऱ्या राजपाल यादवला कोर्टाने फटकारलं

अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात कोर्टाने सुनावणीदरम्यान फटकारलं. राजपाल वारंवार आपली भूमिका बदलत असल्याने कोर्टाने त्याला आणखी मुदत देण्यास नकार दिला. सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं, सविस्तर वाचा..

मला पुन्हा जेलमध्ये पाठवा.. म्हणणाऱ्या राजपाल यादवला कोर्टाने फटकारलं
Rajpal YadavImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 03, 2026 | 9:13 AM
Share

अभिनेता राजपाल यादवचं 9 कोटी रुपयांचं चेक बाऊन्स प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याप्रकरणी त्याने तुरुंगवासही भोगला असून त्याची सध्या जामिनावर सुटका झाली आहे. न्यायालयने राजपालला हे प्रकरण मिटवण्यासाठी शेवटची संधी दिली. राजपालने थकीत रकमेचा मोठा भाग जमा केल्यामुळे त्याची तुरुंगवासाची शिक्षा टळली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 एप्रिल रोजी होणार आहे. परंतु गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राजपाल न्यायाधीशांसमोर भावूक झाला होता. न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा या प्रकरणाची सुनावणी करत होत्या. यावेळी राजपालने भावूक होऊन आपली व्यथा सांगितली तेव्हा न्यायाधीशांनी त्याला फटकारलं. सुनावणीदरम्यान बरेच प्रयत्न करूनही दोन्ही पक्षांमध्ये कोणताही करार होऊ शकला नाही. अखेर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.

सुनावणीदरम्यान राजपाल यादव कर्जाची परतफेड करण्याबाबत त्याची भूमिका वारंवार बदलत होता. तेव्हा तक्रारदाराचं प्रतिनिधित्व करणारे वकील अवनीत सिंह सिक्का यांनी युक्तीवाद केला की, “राजपाल यांनी आपली शिक्षा आधीच स्वीकारली आहे आणि आता ते पैसे परत करण्याच्या जबाबदारीतून सुटू शकत नाहीत. 2024 मध्ये दाखल केलेल्या याचिकेत 1894 दिवसांचा विलंब झाला होता आणि त्यामुळे कर्जमाफी करणं योग्य नाही. तसंच शिक्षा भोगल्याने आर्थिक जबाबदारीतून सुटका होत नाही. राजपालने पैसे देण्याबाबत वारंवार दिलेली आश्वासनं पाळली नाहीत.”

अखेर न्यायालयाने वाटाघाटीद्वारे तोडग काढण्याच्या शक्यतेचा विचार केला आणि दोन्ही पक्षांना तडजोड करण्याचा विचार करण्यास सांगितलं. तक्रारदाराने पूर्ण आणि अंतिम रक्कम म्हणून सहा कोटी रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. मात्र राजपाल यादवने या प्रस्तावाला विरोध केला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहिलेल्या राजपालने न्यायालयाला सांगितलं की, “मी आधीच मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करतोय. माझे पाच फ्लॅट्स विकून मी काही रक्कम भरली आहे. वाटल्यास मला आणखी पाच वेळा तुरुंगात पाठवा.” हे ऐकून न्यायाधीशांनी तीन कोटी रुपये एका निश्चित कालावधीत परतफेड करण्यासाठी योजना युचवली. तरीही दोन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ न शकल्याने अखेर सुनावणीदरम्यान राजपालच्या वर्तनाबद्दल न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. “जर न्यायाधीश तुमच्याशी चांगले वागत असतील, तर त्यांना कमी लेखू नका. यामुळे न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया जात आहे. तुम्ही पैसे देण्यास तयार आहात असं म्हणत आहात, पण तुमचे वकील म्हणत आहेत की तुम्ही आधीच तुरुंगात गेल्यामुळे पैसे देणार नाही. जर तुम्ही पैसे देण्यास तयार असाल, तर मी ह खटला का ऐकत आहे”, अशा शब्दांत त्यांनी राजपालला फटकारलं.

अखेर सुनावणीच्या शेवटी राजपालने 6 कोटी रुपये भरण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी आणखी 30 दिवसांची मुदत मागितली, परंतु न्यायाधीशांनी ती नाकारली. न्यायमूर्ती म्हणाले, “नाही म्हणजे नाही. मी माझा निर्णय राखून ठेवत आहे. मी आणखी वेळ देणार नाही.” हा संपूर्ण वाद 2010 मध्ये सुरू झाला, जेव्हा राजपाल यादवने त्याच्या ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून पाच कोटी रुपये कर्ज घेतलं होतं.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!