AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajpal Yadav: राजपाल यादवला मुश्ताक खानच्या प्रेयर मीटमधून हकललं? सत्य आलं समोर

Rajpal Yadav: मुश्ताक खान यांच्या कुटुंबियांनी राजपाल यादव यांना प्रार्थना सभेतून काढून टाकल्याची बातमी व्हायरल झाली होती. आता, कंटेंट क्रिएटर नजमा शेखने या व्हायरल व्हिडिओमागील सत्य उघड केले आहे.

Rajpal Yadav: राजपाल यादवला मुश्ताक खानच्या प्रेयर मीटमधून हकललं? सत्य आलं समोर
rajpal yadavImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 2:40 PM
Share

अलीकडेच बॉलिवूड अभिनेता मुश्ताक खान यांचं निधन झालं. ३० सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या प्रेयर मीटमध्ये अनेक सेलिब्रिटीज उपस्थित होते. यादरम्यान एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात एक महिला ओरडताना दिसत होती आणि त्यानंतर राजपाल यादव बाहेर जाताना दिसत होते. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की मुश्ताक खानच्या प्रेयर मीटमधून राजपाल यादवला बेइज्जत करून बाहेर काढण्यात आलं. मात्र आता कंटेंट क्रिएटर नजमा शेख यांनी संपूर्ण सत्य सांगितलं आहे आणि म्हटलं आहे की व्हिडीओमध्ये जे दिसतंय, सत्य त्याच्या उलट आहे.

कंटेंट क्रिएटर नजमा शेख यांनी शुक्रवारी आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी राजपाल यादवच्या व्हायरल व्हिडिओमागील संपूर्ण सत्य सांगितले आहे. व्हिडीओमध्ये राजपाल यादवला मुश्ताक खानच्या प्रेयर मीटमधून काढून टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्या म्हणाल्या, “माझं नाव नजमा शेख आहे आणि आज मी मिस्टर मुश्ताक खानच्या प्रेयर मीटबाबत बोलणार आहे. लोकांनी इतक्या चुकीच्या समजूती पसरवल्या आहेत की त्यांना काहीच मर्यादा उरलेली नाही. आता मी तुम्हाला सत्य सांगते. खरं तर राजपाल यादव मुश्ताक खानचे खूप जवळचे होते. ते त्यांच्या लहान भावासारखे होते. मुश्ताक खानच्या मृत्यूच्या दोन तास आधी राजपाल यादव त्यांच्यासोबत होते. ज्या दिवशी मुश्ताक खानला स्मशानभूमीत नेण्यात आलं, त्या दिवशीही राजपाल यादव तिथे उपस्थित होते. त्यांच्या प्रेयर मीटच्या दिवशीही राजपाल यादव तिथे होते.”

फोटो काढायला आले होते काही लोक

त्या पुढे म्हणाल्या, “तिथे काही लोक असेही होते जे फक्त फोटो काढायला आले होते, तर ती जागा फोटो काढण्याची नव्हती. ती जागा एखाद्याच्या शांततेसाठी प्रार्थना करण्याची होती.” त्या म्हणाल्या की, “लोक सतत मुकेश ऋषी, उपासना सिंह आणि राजपाल यादव यांसारख्या अभिनेत्यांसोबत फोटो काढत होते. तो कोणताही सेल्फी पॉइंट नव्हता. ती एक प्रार्थना सभा होती. माझा राग त्या लोकांवर होता जे तिथे फक्त फोटो काढायला आले होते आणि त्यांना याची जाणीव नव्हती की ते कशा प्रकारच्या वातावरणात आहेत. मी माझा राग अशा लोकांवर व्यक्त केला होता, राजपाल यादववर नाही. मी मीडियामधील आपल्या मित्रांना विनंती करते की ते दिशाभूल करणाऱ्या गोष्टी पसरवू नका आणि कृपया संपूर्ण सत्य सांगा.”

मुश्ताक खानला राजपाल यादव यांची श्रद्धांजली

मुश्ताक खानच्या प्रेयर मीटबाबतच्या वादापूर्वी राजपाल यादव यांनी इंस्टाग्रामवर मुश्ताक यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. त्यांनी लिहिलं होतं की अभिनेत्याच्या निधनाच्या फक्त दोन तास आधी ते मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्यांच्यासोबत होते.

Follow Us
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित पवारांना थेट सवाल!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं