AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7,70,00,00,00,000 कोटींची मालकीण आहे राम चरणची पत्नी, उपासना कोनिडेला नेमकं काय करतात?

राम चरणच्या यशामागे पत्नी उपासनाचीही मोठी ओळख; चित्रपटांपासून दूर राहूनही आहेत हजारो कोटींच्या संपत्तीच्या मालकीण.

7,70,00,00,00,000 कोटींची मालकीण आहे राम चरणची पत्नी, उपासना कोनिडेला नेमकं काय करतात?
| Updated on: Jun 07, 2026 | 10:40 AM
Share

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण सध्या त्याच्या ‘पेद्दी’ या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत अवघ्या तीन दिवसांमध्ये भारतासह तेलुगूमध्ये 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 200 कोटी रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाच्या या यशाचा आनंद राम चरणची पत्नी उपासना कोनिडेला यांनी केक कापून साजरा केला.

उपासना कोनिडेला या चित्रपटसृष्टीपासून दूर राहणे पसंत करतात. त्या कोणत्याही चित्रपटात काम करत नाहीत किंवा मनोरंजन क्षेत्रात सक्रिय नाहीत. मात्र, सोशल मीडियावर त्या चांगल्याच सक्रिय असून वैयक्तिक आयुष्याशी संबंधित फोटो आणि माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतात. पती राम चरणच्या प्रत्येक यशाचा आनंद त्या मोठ्या उत्साहाने साजरा करताना दिसतात.

यशस्वी उद्योजिका म्हणून वेगळी ओळख

चित्रपटसृष्टीशी संबंध नसला तरी उपासना या देशातील आरोग्य आणि फार्मा क्षेत्रातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व मानल्या जातात. त्या अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांची आई आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजिका आहेत. उपासना या अपोलो समूहाशी संबंधित विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

याशिवाय त्या एफएचपीएल या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारीही सांभाळतात. त्यामुळे उद्योगविश्वात त्यांची स्वतंत्र आणि प्रभावी ओळख निर्माण झाली आहे.

77 कोटींची मालकीण

माध्यमांतील वृत्तांनुसार, उपासना या सुमारे 77 हजार कोटी रुपयांच्या व्यावसायिक साम्राज्याच्या वारसदार मानल्या जातात. त्यामुळे त्या दक्षिण भारतातील सर्वात प्रभावशाली व्यावसायिक महिलांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. विविध अहवालांनुसार, राम चरण आणि उपासना कोनिडेला या दाम्पत्याची एकत्रित संपत्ती सुमारे 2500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी राम चरणची अंदाजे 1370 कोटी रुपयांची तर उपासना यांची सुमारे 1130 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे हे जोडपे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत दाम्पत्यांपैकी एक मानले जाते.

उपासना या उद्योजक अनिल कामिनेनी आणि शोभना कामिनेनी यांच्या कन्या आहेत. अपोलो हॉस्पिटल्स समूहाच्या समृद्ध वारशामुळे त्यांना उद्योग आणि आरोग्य व्यवस्थापन क्षेत्राचा मोठा अनुभव मिळाला आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे