AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff Firing : रुबाब आणि अहंकार जपण्यासाठी हत्या? टायगर श्रॉफवरील गोळीबाराने राम गोपाल वर्मा संतापले!

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्माम भडकले असून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. काय म्हणाले राम गोपाल वर्मा ?

Tiger Shroff Firing :  रुबाब आणि अहंकार जपण्यासाठी हत्या? टायगर श्रॉफवरील गोळीबाराने राम गोपाल वर्मा संतापले!
| Updated on: Oct 19, 2026 | 7:37 PM
Share

Ram Gopal Varma On Tiger Shroff Firing Incident : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर काल मुंबईत झालेल्या गोळीबारानंतर सगळेच हादरले आहेत.घटनास्थळावरून फायरिंगचे जे व्हिडीओ समोर आलेत, ते थरकाप उडवणार आहेत. अवघ्या काही सेकंदांममध्ये 5 राऊंड फायर करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत तीन लोकांना अटक केली आहे. सोशल मीडियावर देखील या हल्ल्याची बरीच चर्चा सुरू आहे. काही सेलिब्रिटींनी देखील या घटनेवर रिॲक्शन दिली. आता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

रविवारी 18 ऑक्टोबर रोजी हल्ला झाल्यावर, आज सोमवार 19 ऑक्टोबर रोजी राम गोपाल वर्मा यांनी सोशल प्लॅटफॉर्म X व एक पोस्ट केली. “ टायगर श्रॉफसोबत जे घडलं, ते यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. खंडणी, सुपारी देऊन हत्या किंवा आपापसातील समझोत्यातून होणाऱ्या हत्यांऐवजी, पहिल्यांदाच असं वाटतंय की आता ते केवळ आपला रुबाब आणि अहंकार जपण्यासाठी हत्या करू इच्छित आहेत.” असं त्यांनी लिहीलं.

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले – हे काय चाललंय ?

या प्रकरणावर अभिनेता आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी देखील X वर पोस्ट करत लिहिलं, “ हे काय चाललंय? काल आपला सर्वांचा लाडका आणि अत्यंत प्रतिभावान जॅकी श्रॉफ यांचा तितकाच प्रतिभावान मुलगा टायगर श्रॉफ याच्यावर चिंताजनक हल्ला करण्यात आला, त्याला धमक्या देण्यात आल्या, त्याला टार्गेट करण्यात आलं आणि त्याच्यावर गोळीबार झाला. खरं तर, टायगर या हल्ल्यातून थोडक्यात बचावला; मात्र त्याचा निष्पाप चालक गंभीर जखमी झाला. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गंभीर प्रकरणाबाबत अत्यंत चिंतित असल्याचं दिसत आहे. जय हिंद!” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.

अमाल मलिकची प्रतिक्रिया

दरम्यान, गायक आणि संगीतकार अमाल मलिक यानेही टायगर श्रॉफबद्दल चिंता व्यक्त केली. “ टायगरने  सुरुवातीपासूनच प्रत्येकाचं मनोरंजन केलं आहे. ज्या व्यक्तीने कधीही जाणीवपूर्वक कोणाचं वाईट केलं नाही आणि जी व्यक्ती माझ्या ओळखीच्या सर्वांत दयाळू व्यक्तींपैकी एक आहे, तिला या सगळ्याचा सामना का करावा लागतोय, हे मला समजत नाही. टायगर, स्वतःची काळजी घे भावा. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. सध्या तरी फक्त कुटुंबासोबत राहा आणि इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस.” असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. मुंबईत हे सर्व काय चाललंय, असं विचारत त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना टॅग करत टायगरच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती केली.

Follow Us
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...