AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रामायण’ पाहण्यासाठी आता 8 नोव्हेंबरपर्यंत थांबावं लागणार नाही? रणबीर-यशच्या सिनेमाबाबत मोठी अपडेट

रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची रिलीज डेट बदलू शकते, अशी बातमी समोर येत आहे. दिवाळीच्या आधीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. मेकर्स याबद्दल लवकरच घोषणा करू शकतात.

‘रामायण’ पाहण्यासाठी आता 8 नोव्हेंबरपर्यंत थांबावं लागणार नाही? रणबीर-यशच्या सिनेमाबाबत मोठी अपडेट
| Updated on: Sep 28, 2026 | 2:30 PM
Share

प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर याचा बहुचर्चित ‘रामायण’ (Ramayana) चित्रपटाची चाहते उत्सुकनेते वाट बघत आहेत. हा चित्रपट रिलीज होण्यास अजून जवळपास दीड महीना आहे. पिक्चरचा ट्रेलर आणि म्युझिकने आधीच कमाल केली असून हा पिक्चर मोठ्या पडद्यावर पाहण्यास सगळेच आतूर आहेत. रणबीर कपूर हा श्रीरामाच्या तर अभिनेत्री साई पल्लवी ही सीतामाईच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रावणाच्या भूमिकेत अभिनेता यश हा झळकणार आहे. ग्रँड अनाऊन्समेंटमध्ये मेकर्सनी फिल्मची ओव्हरसीज रिलीज डेट ही 5 नोव्हेंबर आणि भारतातली तारीख दिवाळीला म्हणजेच 8 नोव्हेंबरला सांगितली होती. पण आता लेटेस्ट अपडेटनुसार, ही रिलीज डेट बदलण्याचा प्लान मेकर्स करत आहेत. म्हणजेच 8 नोव्हेंबर पूर्वीच प्रेक्षकांना ‘रामायण’ चित्रपट पहायला मिळू शकतो.

कधी प्रदर्शित होणार रामायण ?

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 5 नोव्हेंबर, गुरूवारीच हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करतील असं मेकर्सनी ठरवलं आहे. यावेळी ही फिल्म संपूर्ण जगात म्हणजे भारतासह ओव्हरसिजमध्येही एकाच दिवशी रिलीज होणार आहे. या दिवशी फिल्मच्या रिलीजबद्दल टीमचे लोकही सहमत आहेत. सगळं फायनल झालं तर मेकर्स लौकरच ‘रामायण’च्या नवीन रिलीज डेटची घोषणा करू शकतात.

दिवाळीच्या सुट्टीचा होणार फायदा

जर रामायण हा चित्रपट 5 नोव्हेंबरला रिलीज झाला तर त्यातून मेकर्सना जबरदस्त फायदा होण्याची आशा आहे. 2014 नंतर दिवाळीनंतरच मोठे चित्रपट रिलीज झाले आहेत, असं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहत. कारण सणा-सुदीच्या दिवशी लोकं पूजेत, सेलिब्रेशनमध्ये बिझी असतात. मात्र, रामायणच्या मेकर्सनी ही फिल्म दिवाळीपूर्वी तीन दिवस आधी रिलीज करण्याची योजना केली आहे. मेकर्सना त्यांच्या ह्या चित्रपटावर खूप विश्वास आहे. याशिवाय दिवाळीनंतर सण असल्यामुळे सुट्याही आहेत ज्याचा फायदा ह्या फिल्मला होऊ शकेल अी अपेक्षा आहे.

रामयणमध्ये कोण कोण झळकणार ?

नितेश तिवारीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात रणबीर हा श्रीरामाच्या तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. रवि दुबेनी लक्ष्मणची भूमिका साकारली आहे. याशिवाय यश, रावण बनून झळकणार आहे. चित्रपटाची कास्ट खूप मोठी आहे. सनी देओल, हनुमानच्या भूमिकेत दिसेल. चित्रपटात लारा दत्ता, शीबा चड्ढा, काजल अग्रवाल, अरुण गोविल यांच्यासह अनेक मोठे अभिनेते दिसणार आहेत. मागील काही वर्षांपासून या चित्रपटावर काम सुरु होतं. कुमार विश्वास यांनी चित्रपटाचे गाणी लिहिली आहेत. ए आर रहमानचे संगीत आहे. नमित मल्होत्रा हे याचे प्रोड्यूसर आहेत.

Follow Us
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?