Ramayana Box Office Collection Day 12: आदिनाथ कोठारेच्या ‘रामायण’च्या कमाईचं गणित बदललं, शॉकिंग कलेक्शनचा आकडा समोर

Ramayana Box Office Collection Day 12: सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'रामायण' सिनेमाची चर्चा सुरु आहे. सलग 12 दिवस सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. आता देखील सिनेमाच्या 12 व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे. तर जाणून घ्या 12 व्या दिवशी सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Ramayana Box Office Collection Day 12:  आदिनाथ कोठारेच्या रामायणच्या कमाईचं गणित बदललं, शॉकिंग कलेक्शनचा आकडा समोर
Ramayana
| Updated on: Nov 17, 2026 | 7:56 AM

Ramayana Box Office Collection Day 12: अभिनेता रणबीर कपूर, यश, आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री साई पल्लवी स्टारर ‘रामायण’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. सलग 12 व्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवरील सिनेमाची पकड मजबूत असल्याचं दिसून येत आहे. 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ सिनेमाने 1000 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. फक्त आठ दिवसात सिनेमाने जगभरात 1000 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर 12 व्या दिवशी सिनेमाने किती कोटी कमावले, याचा आकडा देखील समोर आला आहे. तर जाणून घ्या दुसऱ्या सोमवारी ‘रामायण’ सिनेमाने किती कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘रामायण’ बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 12

Loading...

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूर स्टारर ‘रामायण’ सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 64.85 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर पहिल्या सोमवारी सिनेमाने सर्वात जास्त कमाई केली आणि 100 कोटी रुपयांचा आकडा पार केला. सिनेमाने आठ दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला असून जगभरात सिनेमाने 1000 कोटींची कमाई केली आहे.

सोमवारी बदलला सिनेमाच्या कमाईचा आकडा…

12 व्या दिवशी ‘रामायण’ सिनेमाच्या कमाईचा आकडा मंदावलेला दिसला. रविवारी सिनेमाने तब्बल 75 कोटी रुपयांची कमाई केली. तर सोमवारी सिनेमाने फक्त 24.93 कोटी रुपयांची कमाई केली. 12 दिवसांच्या कालावधीत, ‘रामायण’ सिनेमाची आतापर्यंतची ही सर्वात कमी कमाई आहे. या कमाईसह, भारतातील सिनेमाची नेट कमाई 785.53 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर भारतातील ग्रॉस कमाई 938.42 कोटी रुपये इतकी झाली आहे.

‘रामायण’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘रामायण’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी सिनेमाला अनेकांनी विरोध केला. पण याचा कोणताच परिणाम बॉक्स ऑफिसवर झालेला दिसून आलेला नाही. सिनेमातील काही सीन आणि गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमाचं 4000 कोटी रुपये असून सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा दुसरा भाग 2028 मध्ये प्रदर्शित होणार असून सिनेमाचं शुटिंग सुरु झालं आहे. ‘रामायण’ सिनेमा

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us