Arun Govil : लोक माझ्या पाया पडतात, माझ्या फोटोची पूजा करतात…’रामायण’ फेम अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

Ramayana Fame Actor : 'रामायण' फेम अरुण गोविल यांनी नुकत्याच एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Arun Govil : लोक माझ्या पाया पडतात, माझ्या फोटोची पूजा करतात...रामायण फेम अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत
| Updated on: Nov 16, 2026 | 10:06 PM

ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल हे रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील प्रभू रामाच्या भूमिकेसाठी सर्वाधिक ओळखले जातात. या भूमिकेमुळे ते इतके लोकप्रिय झाले की, अनेक चाहते त्यांना खऱ्या आयुष्यातही प्रभू राम म्हणूनच पाहू लागले आणि त्यांचा प्रचंड आदर करू लागले. रामाची प्रतिमा चाहत्यांच्या मनात इतकी खोलवर रुजली होती की, त्यांना इतर भूमिकांमध्ये काम मिळवणं कठीण झालं.

काय म्हणाले अरुण गोविल?
अरुण गोविल यांनी ‘स्क्रीन’ला सांगितलं की, ‘माझी प्रतिमा इतकी पक्की झाली होती की, निर्माते आणि दिग्दर्शक मला पुढे कोणत्या प्रकारची भूमिका द्यावी याचा विचार करू लागले होते. यामुळे, मी अनेक वर्षे एकाच प्रकारच्या भूमिकांपुरता मर्यादित राहिलो. पण माझा विश्वास होता की, प्रभू रामाची भूमिका साकारून मला जे मिळालं, ते त्या काळात अनेक चित्रपट किंवा टीव्ही मालिकांमध्ये काम करूनही मिळालं नसतं.’

Loading...

‘जर मी चित्रपट किंवा टीव्ही मालिकांमध्ये काम करत असतो, तर माझी लोकप्रियता आणखी वाढली असती, पण ‘राम’च्या भूमिकेनं मला जे दिलं आहे, ते अतुलनीय आहे. तुम्हाला माहीत आहे, आजही लोक माझा खूप आदर करतात. तरुण पिढी आजही माझ्या पाया पडते आणि माझे आशीर्वाद घेते, आणि मला इतका आदर मिळतो की, मी प्रवेश करताच लोक उभं राहतात. जर ते नसतं, तर मला हे सर्व कधीच मिळालं नसतं. म्हणून, आयुष्यात आपण नेहमी कोणत्याही गोष्टीचे फायदे आणि तोटे विचारात घेतले पाहिजेत. मला नाही वाटत की, माझ्या आयुष्यात जे मला मिळालं आहे, ते इतर कोणाला मिळालं असतं. 1987 पासून आजपर्यंत अनेक घरांमध्ये माझ्या फोटोची पूजा केली जाते. हे सर्व तुम्ही तुमच्या आयुष्यात कशाला प्राधान्य देता यावर अवलंबून आहे.’

राम आणि दशरथाच्या भूमिका साकारताना काही विशेष खबरदारी घेतली होती का, असंही अरुण यांना विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले, ‘बघा, हे लोकांचं मत आहे, त्यांचा विचार आहे. मी रोज प्रार्थना करतो. माझ्या आयुष्यात सर्व काही सकारात्मक आहे. सकाळी आणि संध्याकाळी जवळपास एक तास प्रार्थना करणं, हा माझ्या दिनचर्येचा भाग आहे, त्यामुळे मला काही फरक पडत नाही. माझ्यासाठी प्रत्येक दिवस सारखाच असतो आणि प्रत्येक कामही सारखंच असतं.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us