AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana Siya Ram First Look: ‘रामायण’ सिनेमाची पहिली झलक समोर, ‘सिया राम’चा पहिला लूक करेल हृदयाला स्पर्श

Ramayana Siya Ram First Look: बहुचर्चित रामायण सिनेमाचा पहिला लूक समोर आला आहे. सोशल मीडियावर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एक टीझर शेअर करण्यात आला आहे. या टीझरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Ramayana Siya Ram First Look: 'रामायण' सिनेमाची पहिली झलक समोर, 'सिया राम'चा पहिला लूक करेल हृदयाला स्पर्श
ramayanImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 14, 2026 | 12:13 PM
Share

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित पौराणिक चित्रपट ‘रामायण’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या सिनेमात रणबीर कपूर आणि साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा आता पहिला लूक समोर आला आहे. एक टीझर पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. हे टीझर पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरला असून अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

रामायण या चित्रपटातील पहिले गाणे ‘जय जय राम’ लवकरच रिलीज होणार आहे. त्याआधी निर्मात्यांनी ‘सिया राम’चे एक मोशन पोस्टर रिलीज केला आहे. उल्लेखनीयबाब म्हणजे ‘रामायणा’चे पहिले गाणे चित्रपटाच्या म्युझिकल कॅम्पेनची सुरुवात असेल.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मोशन पोस्टर प्रदर्शित

रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट ‘रामायण’ प्रदर्शित होण्यापूर्वी खूप चर्चेत आहे. १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ७:३० वाजता ‘सिया राम’ पोस्टरच्या रिलीजसोबत निर्मात्यांनी चित्रपटाच्या म्युझिकल कॅम्पेनची सुरुवात केली. निर्मात्यांच्या मते भगवान गणेशाच्या आशीर्वादाने चित्रपटाच्या म्युझिकल प्रवासाची सुरुवात करणे हे कोणत्याही कामाचे शुभ संकेत आहेत. मोशन पोस्टरचे पार्श्वसंगीतही खूप उत्कृष्ट आहे आणि लोक त्याची प्रशंसा करत आहेत. आता चाहते चित्रपटाच्या पहिल्या गाण्याची वाट पाहत आहेत, जे लवकरच रिलीज होणार आहे.

‘रामायण’चे ‘जय जय राम’ गाणे लवकरच रिलीज होणार

‘रामायण’चे ‘जय जय राम’ गाणे ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केले आहे आणि त्याचे बोल डॉ. कुमार विश्वास यांनी लिहिले आहेत. अरिजीत सिंह आणि श्रेया घोषाल यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. हे गाणे ‘रामायण’च्या म्युझिकल कॅम्पेनची सुरुवात आहे, जे चित्रपटाच्या प्रमोशनचा एक महत्त्वाचा भाग असेल. पण त्याआधी ‘सिया राम’ पोस्टरवर एक नजर टाकूया.

निर्मात्यांनी केली होती घोषणा

निर्मात्यांनी सोशल मीडियावर ‘सिया राम’ पोस्टर आणि पहिल्या गाण्याच्या लॉन्चची घोषणा केली होती. इंस्टाग्रामवर एक नोट शेअर करत त्यांनी लिहिले, “प्रत्येक शुभ सुरुवात प्रार्थनेने होते. या गणेश चतुर्थीला, रामायणचा म्युझिकल प्रवास सकाळी ७:३० वाजता आमच्या ‘सिया राम’ पोस्टरच्या रिलीजसोबत सुरू होत आहे. त्यानंतर लगेचच आमची पहिली म्युझिकल भेट, ‘जय जय राम’ येणार आहे. संगीत: ए.आर. रहमान, बोल: डॉ. कुमार विश्वास, गायक श्रेया घोषाल आणि अरिजीत सिंह.”

‘रामायण’ची स्टार कास्ट

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ दोन भागांत रिलीज होणार आहे. चित्रपटात रणबीर कपूरने भगवान श्रीरामची भूमिका साकारली आहे, तर साई पल्लवी माँ सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे आणि यश रावणाच्या रूपात दिसणार आहेत. उर्वरित कलाकारांमध्ये लक्ष्मणच्या भूमिकेत रवी दुबे आणि हनुमानच्या भूमिकेत सनी देओल दिसणार आहेत. हा चित्रपट जगभरात ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीच्या सुमारास रिलीज होणार आहे. तर हा चित्रपट भारतात ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रिलीज होणार आहे. ‘रामायण’चा दुसरा भाग २०२७ मध्ये दिवाळीदरम्यान रिलीज होणार आहे.

Follow Us
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...