AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana Teaser : रामायण चित्रपटाचा टीझर पाहून प्रचंड नाराजी, लोक म्हणाले यापेक्षा तर आदिपुरुष बरा; नेमका आक्षेप काय?

रणबीर कपूर याची मुख्य भूमिका असलेल्या रामायण या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. परंतु हा टीझर पाहून सिनेरसिक खूपच नाराज झाले आहेत. या चित्रपटाची तुलना आदिपुरुष या चित्रपटाशी केली जात आहे.

Ramayana Teaser : रामायण चित्रपटाचा टीझर पाहून  प्रचंड नाराजी, लोक म्हणाले यापेक्षा तर आदिपुरुष बरा; नेमका आक्षेप काय?
ramayana ranbir kapoor filmImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 02, 2026 | 9:57 PM
Share

गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या रामायण या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागलेली होती. हा चित्रपट नेमका कसा असेल? असे प्रत्येकजण विचारत होता. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. तसेच तांत्रिक बाबींवरही काम सुरू होते. त्यानंतर आता चाहत्यांची उत्सुकता संपलेली असून या चित्रपटातील भगवान राम नेमके कसे असतील याची झलक पाहायला मिळाली आहे. भगवान हनुमान जयंतीचे निमित्त साधून या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. परंतु हा टीझर पाहून सिनेरसिक नाराज झाले आहेत. यापेक्षा अभिनेता प्रभास याचा आदिपुरूष हा चित्रपट खूप चांगला होता, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या या रामायण चित्रपटाचे टीझर रिलीज करण्यात आले आहे. या टीझरला काही तासांत दीड मिलीयनपेक्षाही जास्त व्ह्यूज आले आहेत. परंतु हा टीझर पाहून अनेकांनी चित्रपटाबाबत निराशा व्यक्त केली आहे. नेटकऱ्यांनी चित्रपटाचे व्हीएफएक्स आणि इतर तांत्रिक बाबींवर सडकून टीका केली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नेमकी कशी कामगिरी करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टीझरवर नेमका आक्षेप काय?

काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाच्या टीझरची तुलना प्रभासची प्रमुख भूमिका असलेल्या आदिपुरूष या चित्रपटाशी केली आहे. आदिपुरुष हा चित्रपट आल्यानंतर सिनेरसिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. सुमार चित्रिकरण, अतिशय निकृष्ट दर्जाचे ग्राफिक्स यामुळे हा चित्रपट पाहून लोक नाराज झाले होते. अशाच प्रकारची भावना आता रणबीर कपूरच्या रामायण या चित्रपटाबाबत व्यक्त केली जात आहे.

एका नेटकऱ्याने आदिपुरुष हा चित्रपट सध्याच्या रामायण या चित्रपटापेक्षा चांगला होता, असे वाटत आहे. या चित्रपटात वापरण्यात आलेले एआय, व्हिएफएक्स निकृष्ट दर्जाचे आहेत. तसेच सुमार एडिटिंग केलेली आहे, अशी भावना व्यक्त केली. तर नेटकऱ्यांनी फक्त पैसेच कमवणे सर्वकाही नसते असे म्हणत चित्रपटाच्या टीझरवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नेमकी काय कमाल दाखवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...