AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Kapoor : ‘रामायण’च्या चर्चेदरम्यान रणबीर कपूरची मोठी डील; पुण्यातील फ्लॅटचं भाडं ऐकून व्हाल थक्क!

बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूरने पुण्यातील आलिशान फ्लॅट भाड्याने दिला आहे. हा करार तीन वर्षांसाठी आहे. यापूर्वी त्याने मुंबईतील अपार्टमेंटही भाड्याने दिलं होतं. पुण्यातील फ्लॅटचं किती मिलणार भाडं ?

Ranbir Kapoor : 'रामायण'च्या चर्चेदरम्यान रणबीर कपूरची मोठी डील; पुण्यातील फ्लॅटचं भाडं ऐकून व्हाल थक्क!
| Updated on: Oct 16, 2026 | 6:45 PM
Share

बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहेत. पुढल्या महिन्यात दिवाळीच्या आसपास रिलीज होणाऱ्या या फिल्मचं प्रमोशन करण्यात रणबीर खूपच बिधझी आहे. याचदरम्यान त्याच्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. रणबीरने त्याची एक आलिशान प्रॉप्रटी भाड्याने दिल्याची माहिती समोर येत आहे. याद्वारे रणबीरला दर महिन्याला साडेचार लाख रुपयांपेक्षा अधिक भाडं मिळणार आहे. कुठे आहे त्याची ही प्रॉपर्टी, चला जाणून घेऊया..

पुण्यातले अपार्टमेंट दिलं भाड्याने

रणबीर कपूर लोकप्रिय अभिनेता तर आहेच पण तो अत्यंत श्रीमंतही आहे. मुंबईशिवाय इतर अनेक ठिकाणीही त्याच्या मालकीची मालमत्ता आहे. पुण्यातही अभिनेत्याचा एक आलिशान फ्लॅट आहे. CRE Matrix कडून मिळालेल्या माहितीनुसार, रणबीरने हा फ्लॅट भाड्याने दिला असून, त्याला दरमहा 4,63,050 रुपये Rent मिळणार आहे. रणबीरने 2015 साली 11 कोटींपेक्षा अधिक किमतीला हे घर विकत घेतलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरचं हे अपार्टमेंट पुण्यातील येरवडा परिसरातील ‘ट्रम्प टॉवर्स’मध्ये आहे. या अपार्टमेंटचा एकूण कारपेट एरिया 6,094 चौरस फूट आहे. कागदपत्रांनुसार, हा भाडेकरार तीन वर्षांसाठी करण्यात आला असून तो 20 सप्टेंबर 2026 ते 19 सप्टेंबर 2029 पर्यंत राहील. या कराराची नोंदणी नुकतीच, 6 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात आली. या अपार्टमेंटसोबत भाडेकरूला तीन कव्हर्ड कार पार्किंगची सुविधाही मिळणार आहे. तीन वर्षांच्या या करारानुसार, दरवर्षी भाड्यात 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. या अपार्टमेंटमधून रणबीरला एकूण सुमारे 1.75 कोटी रुपये भाडे मिळणार आहे.

मे महिन्यातही भाड्याने दिलं होतं अपार्टमेंट

यापूर्वी मे 2026 मध्येही रणबीर कपूरने मुंबईतील त्याच्या एका अपार्टमेंटसंदर्भात मोठा भाडेकरार केला होता. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, रणबीरने त्याचं अपार्टमेंट आदित्य शुक्ला यांना दरमहा 11 लाख रुपयांच्या भाड्याने पाच वर्षांसाठी दिलं. वास्तू इमारतीच्या सातव्या मजल्यावर असलेले हे अपार्टमेंट रणबीरने 2016 साली 35 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.

कधी रिलीज होणार ‘रामायण’?

रणबीरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याचा रामायण हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दोन भागात हा चित्रपट रिलीज होणार असून दिवाळीच्या आसपास 5 नोव्हेंबरला पहिला भाग प्रदर्शित होईल. यामध्ये रणबीर कपूरने श्रीरामाची तर साई पल्लवीने सीतामाईची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासह अभिनेता यश, रवि दुबे, सनी देओल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून नमित मल्होत्रा प्रोड्यूसर आहे.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?