
रणबीर कपूर सध्याच्या येणाऱ्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. रणबीर कपूर सध्या त्याच्या शुटींगमध्ये खूप व्यस्त आहे. नितेश तिवारीच्या ‘रामायण’ पासून ते संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’ पर्यंत, रणबीरकडे अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट आहेत. अलिकडेच रणबीरने नितेश तिवारीच्या ‘रामायण’चे शूटिंग पूर्ण केले आहे. ज्यामध्ये तो भगवान श्री रामांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता तो संजय लीला भन्साळींच्या बहुप्रतिक्षित ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्यामध्ये आलिया भट्ट आणि विकी कौशल देखील त्याच्यासोबत दिसणार आहेत.
रणबीर कपूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
याच दरम्यान, रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि विकी एकाच फ्लाईटने तेही इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसले. तेव्हाचाच हा व्हिडिओ असून त्याला फ्लाईटमध्ये एक व्यक्ती दिसली ज्याला पाहून तो शॉकच झाला.
रणबीर कपूर कोणाला पाहून शॉक झाला?
व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये, रणबीर निळ्या रंगाचा हाफ शर्ट, पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. फ्लाइटमध्ये त्याच्या सीटकडे जाताना दिसत आहे. यादरम्यान, रणबीरची नजर एका व्यक्तीवर पडते. रणबीर त्या व्यक्तीला पाहताच म्हणताना दिसतोय की “अरे, तू इथे काय करत आहेस?” तर रणबीर ज्या व्यक्तीला पाहून शॉक झाला तो त्याच्याच चित्रपटाचा क्रू मेंबर होता. फ्लाईटमध्ये व्यक्तीला अचानक पाहून रणबीर आश्चर्यचकित झालेला दिसला.
Ranbir even forgot with whom he was in shoot with, asking “tu kya jaa raha” 🤣🤣😭😭 pic.twitter.com/BHRwFeWkKJ
— 𝙑 ♪ (@RKs_Tilllast) August 25, 2025
रणबीर कपूरसोबत विकी कौशलही त्याच फ्लाईटमध्ये होता
हा व्हिडिओ सोशल मीडियावरील रणबीरच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘रणबीर कोणासोबत शूटिंग करत होता हे विसरून गेला की काय आणि त्याला विचारतो – अरे तू इथे काय करतोय? कुठे जात आहेस.’ रणबीरचे चाहते या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा रणबीर राजस्थानमध्ये ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाचे शूटिंग करून मुंबईला परतत होता आणि यावेळी विकी कौशल देखील त्याच्यासोबत त्याच फ्लाईटमध्ये उपस्थित होता.
Vicky Kaushal & Ranbir kapoor😍😍#Vickykaushal #RanbirKapoor pic.twitter.com/dziXT0XNXq
— NARESH (@naresh__off_) August 25, 2025
विकी देखील रणबीरसोबत इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसला
रणबीरसोबत विकी कौशल देखील इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसला.विकीने देखील त्या क्रू मेंबरची विचारपूस केली. विकीने त्याला विचारले- ‘कसा आहेस? आम्हाला टीझर खूप आवडला.’ दरम्यान, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांना इकॉनॉमी क्लासमध्ये पाहून प्रवासी देखील आश्चर्यचकित झाले आणि मागे वळून पाहू लागले.