AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana : रणबीरच्या ‘रामायण’ची रिलीज डेट पुन्हा बदलली , भारतात कधी होणार प्रदर्शित ?

Ramayana Release Date : 8 नोव्हेंबरपासून दिवीळीला सुरूवात होत असून, त्याच मुहूर्तावर रामायण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. मात्र आता याची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.

Ramayana : रणबीरच्या 'रामायण'ची रिलीज डेट पुन्हा बदलली , भारतात कधी होणार प्रदर्शित ?
| Updated on: Oct 09, 2026 | 5:48 PM
Share

अभिनेता रणबीर कपूरचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाबद्दल दिवसेंदिवास उत्सुकता वाढतच चालली आहे. हा पिक्चर पहायला प्रेक्षक आतूर आहेत. मात्र आता या चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा बदलण्यात आली आहे. या चित्रपटाची इंटरनॅशनल रिलीज डेट आता 5 नोव्हेंबर ठरवण्यात आली आहे. सोनी पिक्चर्सच्या जर्मनीतील युट्यूब हँडलनुसार, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी जगभरातील थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. मात्र असं असलं तरी भारतात हाँ पिक्चर कधी प्रदर्शित होणार याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. 8 तारखेला सुरू होणाऱ्या दिवाळीच्या ुहूर्तावर हाँ पिक्चर रिलीज करायचा मेकर्सचा प्लान होता, मात्र त्याबाबत अधिकृतपणे अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही.

रामायणची जुनी रिलीज डेट

विशेष म्हणजे, आधीच चित्रपटाच्या इंग्रजी ट्रेलरमध्ये 6 नोव्हेंबर ही रिलीज डेट दाखवली होती, मात्र आता ती बदलून 5 नोव्हेंबर करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी चित्रपट रिलीज करण्याची परंपरा असल्यामुळे तिथे त्याची रिलीज 6 नोव्हेंबर ठेवली आहे, तर भारतात दिवाळीच्या मूहुर्तावर फिल्म रिलीजचा प्लान आहे, असं प्रोड्यूसर नमित मल्होत्राने ऑगस्टमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं होतं. त्यामुळे चित्रपट 8 नोव्हेंबरला रिलीज करण्याचा प्लॅन होता, पण अजूनही भारतीय रिलीज डेटबाबत मेकर्सची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.

59000 पेक्षा जास्त स्क्रीन्सवर रिलीज होणार चित्रपट

‘रामायण’ हा एक मोस्ट अवेटेड चित्रपट असून त्याची खूप दिवसांपासून वाट पाहिली जात आहे. मेकर्स सिनेमा संदर्भात खूप काळजी घेत आहेत. चित्रपट सुमारे 59000 हून अधिक स्क्रीनवर रिलीझ होणार आहे जो एक मोठा रेकॉर्ड आहे. याआधीही मेकर्सनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ करताना परदेशाप्रमाणे वेळ ठरवली होती, ज्याला भारतात ब्रह्म मुहूर्त म्हणतात. ‘रामायण’ चा अधिकृत ट्रेलर 30 जुलै रोजी सकाळी 4:15 वाजता रिलीज करण्यात आला होता.

4000 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘रामायण’ मध्ये एकाहून एक सरस कलाकार आहेत. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल, रवि दुबे यांसारखे कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत, हाँ पिक्चर 2 पार्ट्समध्ये रिलीज होणार आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...