दीपिकाच्या 16 कोटींच्या घराखाली रणवीर भाडेकरु, महिन्याचं भाडं तब्बल...

रणवीर सिंहने भाड्याने घेतलेल्या फ्लॅटचं प्रत्येक महिन्याचं भाडं आहे तब्बल सव्वा सात लाख रुपये

Ranveer Rents flat in Prabhadevi, दीपिकाच्या 16 कोटींच्या घराखाली रणवीर भाडेकरु, महिन्याचं भाडं तब्बल…

मुंबई : बॉलिवूडचं हॉट कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाला गेल्याच महिन्यात एक वर्ष झालं. मुंबईत ज्या बिल्डिंगमध्ये दीपिका सध्या राहते, तिथेच रणवीरने एक फ्लॅट भाड्यावर (Ranveer Rents flat in Prabhadevi) घेतला आहे. या महागड्या घरांच्या किंमती ऐकून तुम्ही आ वासत उभे राहाल.

मुंबईतील प्रभादेवीमध्ये असलेल्या उच्चभ्रू ‘ब्यूमोंड टॉवर्स’च्या 26 व्या मजल्यावर दीपिका पदुकोणचा फ्लॅट आहे. मुंबईत घरांच्या किंमती अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत. मात्र दीपिका राहत असलेल्या 33 मजली गगनचुंबी इमारतीमधील तिच्या फ्लॅटची किंमत आभाळापेक्षाही जास्त आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. दीपिकाने 2010 मध्ये जेव्हा हा फ्लॅट विकत घेतला, तेव्हा त्याची किंमत तब्बल 16 कोटी इतकी होती. दीपिकाचा हा फ्लॅट 4 बीएचके आहे.

याच इमारतीमध्ये रणवीरने एक फ्लॅट तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतला आहे. या फ्लॅटचं एक महिन्याचं भाडं फार-फार तर लाखभर असावं, असा तुमचा अंदाज असेल. मात्र तुम्ही चुकीचा विचार करत आहात. या फ्लॅटचं प्रत्येक महिन्याचं भाडं आहे तब्बल सव्वा सात लाख रुपये. पहिली दोन वर्ष महिन्याला 7.25 लाख, तर तिसऱ्या वर्षी 7.97 लाख म्हणजेच जवळपास 8 लाख रुपये भाडं रणवीरला महिन्याकाठी मोजावं लागणार आहे. रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडून ही माहिती मिळाल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : नवरी नटली… अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरात लगीनघाई

रणवीर आणि दीपिका सध्या आपल्या ’83’ या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव आणि त्यांच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने 1983 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात कपिल देव यांच्या भूमिकेत रणवीर दिसणार आहे, तर दीपिका पदुकोण त्यांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसेल.

या चित्रपटात दीपिका आणि रणवीर व्यतिरिक्त ताहिर राज भसीन, साकीब सलीम, एमी वर्क, हॅरी संधू, चिराग पाटील आणि साहिल खट्टर दिसणार आहेत. 10 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

दीपिका ‘छपाक’ या चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अ‍ॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. Ranveer Rents flat in Prabhadevi

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *