AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राकेश बापटची पूर्व पत्नी 13 वर्षांनी लहान हिरोच्या प्रेमात? बाथरुम रोमान्स चर्चेत

'द 50' या शोमध्ये भांडणं, वादविवाद, ड्रामा आणि रोमान्स यांचा भरपूर तडका आहे. सध्या शोमध्ये रिधी डोग्रा आणि सिवेत तोमर यांच्यात फार जवळीक निर्माण झाली आहे. या दोघांचा एक नवीन व्हिडीओ चर्चेत आला आहे.

राकेश बापटची पूर्व पत्नी 13 वर्षांनी लहान हिरोच्या प्रेमात? बाथरुम रोमान्स चर्चेत
Raquesh Bapat and Ridhi DograImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 18, 2026 | 1:43 PM
Share

‘द 50’ हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये अभिनेता राकेश बापटची पूर्व पत्नी आणि अभिनेत्री रिधी डोग्राने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. रिधी आणि सिवेत तोमर यांच्यात जवळीक वाढत असून हे दोघं सतत एकमेकांसोबत फ्लर्ट करताना दिसून येत आहेत. इतकंच नव्हे तर शोमध्ये सिवेतने कॅमेरासमोर रिधीला प्रपोजसुद्धा केलं आहे. रिधीसुद्धा सिवेतबद्दल भावना व्यक्त करताना दिसून आली. आता या दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सिवेतची वागणूक पाहून रिधी चिंतेत आली होती. तिने बाथरुममध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या. तिथलाच या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शोमध्ये सिवेत रिधीवर नाराज होतो आणि तो तिच्यापासून दूर राहू लागतो. सिवेतची नाराजी रिधीला सहन होत नाही. त्याची नाराजी दूर करण्यासाठी ती त्याला बाथरुममध्ये घेऊन जाते आणि तिथे विचारते, “तू नेमकं काय करतोय, मला सांगशील का? तुला काय झालंय, हेच मला कळत नाहीये. तू माझ्याशी बोलत का नाहीयेस. मला फार वाईट वाटतंय. मला जाणून घ्यायचंय की नेमकं तुला काय झालंय?” तेव्हा सिवेत तिला सांगतो की रिधीने त्याला ‘ओव्हरफ्रेंडली’ आवडलं नाही. म्हणूनच त्याने तिच्याशी अबोला धरला होता. नंतर रिधी त्याला समजावते की, ती फक्त मस्करी करत होती. रिधी आणि सिवेतचा बाथरुममधील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रिधीच्या अशा वागण्यामुळे चाहत्यांना असं वाटतंय की, तिलाही सिवेत आवडू लागला आहे. म्हणूनच सिवेतने अबोला धरताच ती त्याच्याशी बोलायला गेली. परंतु या व्हायरल व्हिडीओमुळे अनेकजण रिधी आणि सिवेतला ट्रोलसुद्धा करत आहेत. जर भांडण मिटवायचीच गोष्ट करायची होती, तर बाथरुममध्ये जाण्याची काय गरज होती, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. इतर ठिकाणीही दोघं बोलू शकत होते, असंही काहींनी म्हटलंय.

41 वर्षीय रिधी डोग्रा ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ती अभिनेता राकेश बापटची पूर्व पत्नी आहे. या दोघांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या आठ वर्षांनंतर 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. तर दुसरीकडे सिवेत हा 28 वर्षांचा असून रिधीपेक्षा वयाने 13 वर्षांनी लहान आहे. सिवेत हा रिअॅलिटी शो स्टार, मॉडेल आणि अभिनेता आहे. त्याने एमटीव्ही रोडीज आणि स्प्लिट्सविला यांसारख्या शोजमध्येही भाग घेतला होता.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल