Rashmika Mandanna : रश्मिका आजही एक्सच्या संपर्कात; ‘या’ सुपरस्टारसोबत मोडला साखरपुडा

| Updated on: Sep 28, 2023 | 5:49 PM

अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. तिचं नाव 'अर्जुन रेड्डी' फेम अभिनेता विजय देवरकोंडासोबत जोडलं जातं. मात्र 2017 मध्ये रश्मिकाने अभिनेता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता. ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत असेल. मात्र या दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

Rashmika Mandanna : रश्मिका आजही एक्सच्या संपर्कात; या सुपरस्टारसोबत मोडला साखरपुडा
Rashmika Mandanna
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 28 सप्टेंबर 2023 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाने बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळविला. कमी वयात तिने प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही कमावले. चित्रपटांसोबतच रश्मिका तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. अभिनेता विजय देवरकोंडासोबत तिचं नाव जोडलं जातं. मात्र रश्मिकाचा आधी साखरपुडा झाला होता, हे फार कमी लोकांना माहीत असेल. रश्मिकाने दाक्षिणात्य अभिनेता आणि निर्माता रक्षित शेट्टीशी साखरपुडा केला होता. मात्र 2017 मध्ये या दोघांचा साखरपुडा मोडला. यावर रश्मिकाने कधीच कोणती प्रतिक्रिया दिली नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रक्षितने सांगितलं की ते दोघं अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहेत.

रक्षितसोबत साखरपुडा

एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रक्षित म्हणाला, “होय, रश्मिका आणि मी अजूनही संपर्का आहोत. सिनेसृष्टीत तिची खूप मोठी स्वप्नं आहेत. त्यानुसार ती तिच्या स्वप्नांकडे वाटचाल करतेय. ती जे काही ठरवते, ते पूर्णत्वास नेण्यासाठी ती खूप मेहनत करते. तिच्या या यशासाठी आपण कौतुकाने तिची पाठ थोपटायला हवी.” रश्मिकाने ‘कांतारा’ फेम अभिनेता ऋषभ शेट्टीच्या ‘किरिक पार्टी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. यामध्ये तिच्यासोबत रक्षितनेही भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी साखरपुडा केला.

रश्मिकाने मोडला साखरपुडा

रश्मिका आणि रक्षितचा साखरपुडा धूमधडाक्यात पार पडला होता. मात्र नंतर काही कारणास्तव रश्मिकाने हा साखरपुडा मोडला. रक्षित शेट्टीने ‘777 चार्ली’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. रक्षित आणि रश्मिकाच्या वयातही मोठा फरक होता. या दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार कम्पॅटिबिलिटीच्या समस्येमुळे या दोघांचं नातं तुटलं. 2017 मध्ये रश्मिकाने स्वत: रक्षितसोबतचं नातं जाहीर केलं होतं. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी साखरपुडा केला. हे नातं तुटण्यामागचं आणखी एक कारण असंही म्हटलं जातं की रश्मिकाला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं होतं. मात्र याबद्दल दोघांनी कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती.

हे सुद्धा वाचा

रश्मिकाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर ‘गुडबाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं होतं. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर आता तिचा ॲनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिने रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर केला आहे.