AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रश्मिका मंदानाचे होणारे सासू-सासरे काय करतात? विजय देवरकोंडाच्या कुटुंबात कोण कोण?

Virosh Wedding: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नबंधनात अडकणार असून उदयपूरमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. हे दोघं गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या लग्नाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

रश्मिका मंदानाचे होणारे सासू-सासरे काय करतात? विजय देवरकोंडाच्या कुटुंबात कोण कोण?
Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 24, 2026 | 1:39 PM
Share

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा येत्या 26 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेतं. उदयपूरमध्ये अत्यंत थाटामाटात हा लग्नसोहळा पार पडणार असून त्यासाठी रश्मिका आणि विजय त्यांच्या कुटुंबीयांसोबत तिथे पोहोचले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची जोरदार चर्चा होती अखेर दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ‘वेडिंग ऑफ VIROSH’ असं त्यांनी या लग्नाला नाव दिलं आहे. उदयपूरमधील अरावलीमध्ये आयटीसी हॉटेल्स द मोमेंटोसमध्ये लग्नसोहळ्याची सर्व तयारी करण्यात आली आहे. यादरम्यान रश्मिकाचे सासू-सासरे काय करतात, विजय देवरकोंडाच्या कुटुंबात कोण-कोण आहेत, ते पाहुयात..

रश्मिका मंदानाचे होणारे सासरे म्हणजेच विजय देवरकोंडाचे वडील गोवर्धन रावसुद्धा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. त्यांनी अनेक टीव्ही शोजचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय विजयच्या वडिलांनी 2021 मध्ये त्यांच्या मुलासोबत ‘पुष्पक विमानम’ या चित्रपटाचीही निर्मिती केली होती. तर रश्मिकाची होणारी सासू आणि विजयची आई माधवी देवरकोंडा या गृहिणी आहेत. त्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. आपल्या दोन्ही मुलांसोबत ते सतत फोटो शेअर करत असतात.

विजयला एक छोटा भाऊसुद्धा आहे, त्याचं नाव आनंद देवरकोंडा आहे. रश्मिका मंदानाचा होणारा दीर आनंदसुद्धा मोठ्या भावाप्रमाणेच अभिनेता आहे. तेलुगू सिनेसृष्टीत तो आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय. येत्या 26 फेब्रुवारी रोजी रश्मिका आणि विजय हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. आज (24 फेब्रुवारी, मंगळवारी) रश्मिकाच्या हातावर विजयच्या नावाची मेहंदी रंगणार असून उद्या म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी संगीत आणि हळदीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

रश्मिका आणि विजय हे दोघं साऊथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहेत. गेल्या काही वर्षांत रश्मिकाने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, छावा, अॅनिमल यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत. तर विजयला बॉलिवूडच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे रश्मिका आणि विजयकडे ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिलं जातं. या दोघांच्या लग्नासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

Follow Us
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?