AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानींच्या कार्यक्रमात रश्मिकाचा शाही अंदाज, साडीची किंमत ऐकूनच बसेल धक्का

नीता अंबानी यांच्या कार्यक्रमात अभिनेत्री रश्मिका मंदानाचा दिसला शाही अंदाज. अभिनेत्रीने परिधान केलेल्या साडीची किंमत ऐकूनच बसेल धक्का.

अंबानींच्या कार्यक्रमात रश्मिकाचा शाही अंदाज, साडीची किंमत ऐकूनच बसेल धक्का
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 15, 2026 | 7:05 PM
Share

नीता अंबानी यांच्या ‘स्वदेश’ या ब्रँडच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अंबानी कुटुंबीयांसह मनोरंजन आणि इतर क्षेत्रांतील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली. या सोहळ्यात नीता अंबानी, राधिका मर्चंट, श्लोका अंबानी आणि ईशा अंबानी यांच्या पारंपरिक लुकची चर्चा झाली. मात्र, अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या साडी लुकनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे, तिच्या साडीची किंमत ऐकून अनेकांना आश्चर्य वाटू शकतं.

‘स्वदेश’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘देवी शक्ती’ या खास कार्यक्रमासाठी रश्मिकाने वाइन आणि गोल्डन रंगाची आकर्षक साडी नेसली होती. प्रसिद्ध डिझायनर ब्रँड ITRH ची ‘दर्पण’ साडी तिने या सोहळ्यासाठी निवडली होती. साडीवर बारीक अँटिक एम्ब्रॉयडरी करण्यात आली असून, तिच्या पदरावरही भरजरी नक्षीकाम पाहायला मिळतं.

या साडीसोबत रश्मिकाने कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. या ब्लाऊजवर हाताने केलेली भरतकामाची नक्षी असून, त्याच्या मागील बाजूचं डिझाइनही खास लक्षवेधी होतं. तिच्या संपूर्ण लुकमध्ये पारंपरिक सौंदर्य आणि शाही थाट यांचा सुंदर मेळ पाहायला मिळाला.

साडीची किंमत किती?

रश्मिकाच्या या सुंदर लुकची चर्चा होत असतानाच तिच्या साडीच्या किमतीनेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ITRH ब्रँडच्या या ‘दर्पण’ साडीची किंमत तब्बल 2 लाख 55 हजार रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. साडीवरील बारीक भरतकाम, पदरावरील नक्षीकाम आणि हाताने तयार केलेला ब्लाऊज यामुळे तिचा लुक अधिक आकर्षक दिसत होता.

या साडीसोबत रश्मिकाने जगदीश ज्वेलर्सचे गोल्डन दागिने परिधान केले होते. मोठ्या गोल्डन इअररिंग्समुळे तिच्या लुकला खास उठाव मिळाला. ब्लाऊजवर भरजरी नक्षीकाम असल्यामुळे तिने गळ्यात कोणताही दागिना घातला नव्हता.

केशरचनेबाबत बोलायचं झालं, तर ब्लाऊजचं डिझाइन उठून दिसावं यासाठी तिने केसांचा सुंदर अंबाडा बांधला होता. कपाळावरील छोटीशी टिकली तिच्या पारंपरिक लुकमध्ये आणखी भर घालत होती. रश्मिकाच्या या लुकचं स्टायलिंग अमी आणि अनुष्का यांनी केलं होतं. नीता अंबानी यांच्या खास सोहळ्यात रश्मिका मंदानाचा हा शाही साडी लुक चर्चेचा विषय ठरला. लग्नसमारंभ किंवा खास पार्टीसाठी पारंपरिक आणि आकर्षक लुक हवा असेल तर रश्मिकाची ही स्टाइल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.

Follow Us
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर