‘हे’ आहे मेघा धाडेच्या वाईल्ड कार्ड एन्ट्री मागील कारण!

 'हे' आहे मेघा धाडेच्या वाईल्ड कार्ड एन्ट्री मागील कारण!

मुंबई: मराठी बिग बॉस विजेती अभिनेत्री मेघा धाडेला हिंदी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली आहे. मेघाला हिंदी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यामागचं खरं कारण काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल?

हिंदी बिग बॉसचे हे यंदाचे बारावे वर्ष आहे. मेघा धाडेनं पहिल्या मराठी बिग बॉसचा किताब पटकावला आहे. याच कारणामुळे मेघा धाडेला हिंदी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली असल्याचं बोललं जात आहे.

त्यामुळे मेघाला वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली असली तरी मेघा बिग बॉसच्या घरात फार थोड्या दिवसांची पाहुणी आहे. लवकरच ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडेल.  मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या हिंदी बिग बॉसचा मराठी प्रेक्षकवर्ग फार थोडा आहे. त्यामुळे हिंदी बिग बॉसकडे मराठी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी, आयोजकांनी मेघा धाडेला वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्याचा निर्णय घेतला आणि मेघाची एन्ट्री झाली.

इतकंच नाही तर मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनचं प्रमोशन करण्यासाठी मेघाला हिंदी बिग बॉसमध्ये प्रवेश दिला आहे.

मात्र, असं असलं तरी मेघा हिंदी बिग बॉसमध्ये स्पर्धकांना चांगली टक्कर देत असून प्रेक्षकांचे मनोरंजन होत आहे.

Published On - 5:12 pm, Sun, 28 October 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI