मागच्या जन्मात मी बंगालमध्ये जन्मलो असेल… पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?

देशभरात दुसऱ्या टप्प्यासाठी जोरदार मतदान होताना दिसत आहे. सकाळीच मतदारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला. एकीकडे दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत असतानाच दुसरीकडे तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या मालदामध्ये प्रचंड मोठ्या सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी टीएमसी आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

मागच्या जन्मात मी बंगालमध्ये जन्मलो असेल... पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 1:17 PM

देशभरात आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. तर तिसऱ्या टप्प्याचा प्रचार जोरदार सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तिसऱ्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये होते. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. ही टीका करतानाच मागच्या जन्मात आपण पश्चिम बंगालमध्ये जन्मलो होतो, असं मला वाटतंय, असं भावनिक उद्गारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलं. मोदी यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या मालदा उत्तर लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी टीएमसीवर हल्ला चढवला. एकेकाळी पश्चिम बंगाल संपूर्ण देशाच्या विकासाचं नेतृत्व करत होता. परंतु, आधी डाव्यांनी आणि आता टीएमसीने बंगालच्या महानतेला नख लावण्याचं काम केलं आहे. बंगालचा स्वाभिमान धुळीस मिळवला आहे. विकासाला ब्रेक दिला आहे. टीएमसीच्या राज्यात फक्त एकच गोष्ट चालते. ती म्हणजे हजारो कोटींचे घोटाले. घोटाळे टीएमसी करते आणि त्यांची झळ बंगालच्या जनतेला सोसावी लागते, असा हल्लाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चढवला.

ते पैशाची लूट करतात

मोदी केवळ टीएमसीवर टीका करून थांबले नाहीत तर बंगालच्या जनतेला भावनिक आवाहनही केलं. तुमचं एवढं प्रेम पाहून मी मागच्या जन्मात पश्चिम बंगालमध्ये जन्मलो असलो पाहिजे, असं वाटतं. पुढच्या जन्मात मी बंगालमधील एखाद्या मातेच्या पोटीच जन्म घेईल, असं मोदी म्हणाले. बंगालमधील 50 लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान योजनेतील 8 हजार कोटी थेट पाठवले आहेत. पण टीएमसी सरकार पाहा, लूटमार करण्याची एकही संधी सोडत नाही. मी केंद्रातून बंगालच्या विकासासाठी इथल्या सरकारकडे पैसे पाठवतो. पण टीएमसी नेते आणि मंत्री या पैशाची लूट करतात, असा आरोप मोदी यांनी केला.

महिलांवर सर्वाधिक अत्याचार

टीएमसी मां, माटी आणि मानुषचं नाव घेऊन सत्तेत आली. पण या सरकारने सर्वाधिक विश्वासघात महिलांचा केला आहे. तर भाजपने मुस्लिम महिलांना तीन तलाकपासून संरक्षण दिलं. तो कायदाच रद्द केला. टीएमसीने त्यालाही विरोध केला होता. संदेशखालीत महिलांवर अत्याचार झाले. टीएमसी सरकार शेवटपर्यंत मुख्य आरोपीला वाचवत राहिली, असंही मोदी म्हणाले.

काँग्रेस-टीएमसीत तुष्टीकरणाची स्पर्धा

तुष्टीकरण हेच काँग्रेस आणि टीएमसीचं काम आहे. तुष्टीकरणासाठी (लांगूलचालन) हे दोन्ही पक्ष काहीही करू शकतात. त्यासाठी हे लोक देशाहिताचे निर्णयही बदलू शकतात. यांच्यात तुष्टीकरणाची स्पर्धाच लागली आहे. टीएमसी सरकार बांगलादेशी घुसखोरांना राज्यात थारा देत आहे. हे घुसखोर तुमच्या जमिनी आणि शेतीवर कब्जा करत आहेत. तर काँग्रेस तुमची संपत्ती व्होट बँकमध्ये विभागत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.