Rekha: रेखा भांगेत कोणाच्या नावाचं भरतात सिंदूर? दबक्या आवाजात घेतलं जातं बिग बींचं नाव

रेखा भांगेत का भरतात सिंदूर? स्वत:च मुलाखतीत केला होता खुलासा

Rekha: रेखा भांगेत कोणाच्या नावाचं भरतात सिंदूर? दबक्या आवाजात घेतलं जातं बिग बींचं नाव
Amitabh and Rekha
Image Credit source: Facebook
| Updated on: Oct 10, 2022 | 3:47 PM

मुंबई- बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा (Rekha) यांनी त्यांच्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. रेखा यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. मात्र रेखा यांच्या हृदयात फक्त महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना स्थान होतं. या दोघांची प्रेमकहाणी सर्वश्रुत आहे. बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव्ह स्टोरी माहीत नाही असा क्वचितच एखादा असेल. 68 वर्षांच्या रेखा या सौंदर्याच्या बाबतीत आजच्या तरुण अभिनेत्रींनाही टक्कर देतात. अनेक अभिनेत्री त्यांना आपला आदर्श मानतात. चित्रपटांसोबत रेखा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आल्या आहेत.

रेखा या आजसुद्धा जेव्हा एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा पुरस्कार सोहळ्यासाठी तयार होतात, तेव्हा त्यांच्या भांगेत सिंदूर आवर्जून पहायला मिळतो. त्या बिग बींच्या नावाचा सिंदूरच भांगेत भरतात, असं म्हटलं जातं. मात्र यात सत्य किती आहे हे रेखाच सांगू शकतात.

एका मुलाखतीत रेखा यांनी भांगेतील सिंदूरबद्दलचा खुलासा केला होता. “मी कोणाच्या नावाचं सिंदूर भांगेत भरत नाही, तर फॅशन म्हणून मी लावते”, असं त्या म्हणाल्या होत्या. मेकअपसोबत सिंदूर खूप सुंदर दिसत असल्याने लावत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

खरंतर त्याकाळी सर्व वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये रेखा आणि बिग बींच्या कथित प्रेमप्रकरणाच्या बातम्या झळकत होत्या. या सर्व चर्चांना वैतागून अखेर जया यांनी एकेदिवशी रेखा यांना घरी डिनरसाठी बोलावलं होतं. जया यांनी रेखा यांचं आदरातिथ्य केलं, संपूर्ण घर दाखवलं आणि जेवणही पार पडलं. रेखा जेव्हा घरी जाण्यासाठी निघाल्या तेव्हा जया त्यांना म्हणाल्या, “काहीही झालं तरी मी अमिताभजींना सोडणार नाही.” हे ऐकून रेखा यांना धक्काच बसला होता.