AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेखा, माधुरी, उर्मिला अन् विद्या.. अभिनेत्रींचा एकत्र डान्स; शबाना आझमीही थिरकल्या, नेटकरी म्हणाले ‘दुर्मिळ क्षण’

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पार्टीत विद्या, माधुरी आणि उर्मिला यांच्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

रेखा, माधुरी, उर्मिला अन् विद्या.. अभिनेत्रींचा एकत्र डान्स; शबाना आझमीही थिरकल्या, नेटकरी म्हणाले 'दुर्मिळ क्षण'
Rekha, Madhuri, Urmila and ShabanaImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 19, 2025 | 9:24 AM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांनी 18 सप्टेंबर रोजी आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त बी-टाऊनमधील बरेच सेलिब्रिटी पार्टीला उपस्थित होते. उर्मिला मातोंडकरपासून माधुरी दीक्षित, रेखा, विद्या बालन, करण जोहर, मनिष मल्होत्रा, सोनू निगमपर्यंत अनेक लोकप्रिय चेहरे एकाच छताखाली आले. या बर्थडे पार्टीत उर्मिला, विद्या, माधुरी, रेखा यांनी एकत्र डान्स करत चार चाँद लावले. ‘कैसी पहेली है ये’ या गाण्यावर त्यांनी ठेका धरला आणि त्यांना मनमुराद नाचताना पाहून उपस्थित पाहुणेही थिरकायला लागले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अभिनेते संजय कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘शबाना आझमी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय सुंदर संध्याकाळ होती. बॉलिवूडच्या ओरिजिनल क्वीन्स. रेखा, माधुरी, उर्मिला आणि विद्या’, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओमध्ये रेखा, उर्मिला, माधुरी आणि विद्या एकमेकींसोबत नाचताना दिसत आहेत. त्यानंतर शबाना आझमीसुद्धा त्यांच्यात सहभागी होतात आणि नाचू लागतात. रेखा त्यांना डान्स स्टेप्स सांगतात आणि सर्व जणी आपापल्या अंदाजाच मनसोक्त नाचतात. शबाना यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत उपस्थितांना हे दुर्मिळ दृश्य पहायला मिळालं.

पहा व्हिडीओ

शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांचा कपल डान्स

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सर्व दिग्गज अभिनेत्री एकाच फ्रेममध्ये’ असं एकाने लिहिलंय. तर ‘काहीच बदललं नाही. सर्व जणी खूप छान आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘अशी फ्रेम पहायला मिळणं ही चाहत्यांसाठी पर्वणी आहे’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्याही डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘लिटिल लिटिल बेबी’ या गाण्यावर दोघं एकमेकांसोबत कपल डान्स करताना दिसत आहेत. कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘तर तुम्ही अशा प्रकारे पंच्याहत्तरीत प्रवेश करता. शबाना आझमी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जावेद अख्तर आणि तुम्ही अशाच प्रकारे चिरतरुण राहा’, अशा शब्दांत फराहने शुभेच्छा दिल्या आहेत.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?