
अभिनेता संजय दत्त याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिला. संजूबाबा आता तिसरी पत्नी मान्यता दत्त आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. अभिनेत्याच्या पहिल्याचं निधन झालं असून दुसऱ्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. संजूबाबाची दुसरी पत्नी म्हणजे रिया पिल्लाई… रिया ही हैदराबादचे महाराज नरसिंगगीर धनराजगीर ज्ञान बहादूर यांची नात आहे. कठीण काळात एकमेकांची साथ दिल्यामुळे संजय याच्या मनात रिया हिच्याबद्दल प्रेम आणि सन्मान अधिक वाढला.
संजयने व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत रियाला प्रपोज केलं आणि 1998 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्याने सात सिनेमे साइन केले होते. त्यामुळे संजूबाबाकडे रियासाठी वेळ नव्हता. संजूबाबा त्याच्या कामांमध्ये व्यस्त झाला आणि रिया प्रेम असूनही एकटी पडली. म्हणून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या. अखेर संजय आणि रिया यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
घटस्फोटोच्या आधीच रिया हिच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली होती. प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांच्यासोबत रिया रिलेशनशिपमध्ये होती. रिया हिने प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांच्यासोबत संसार थाटला. पण रिया हिच्या आयुष्यात मात्र दुःखाचा डोंगर कोसळला. रिया हिने लिएंजर पेस याच्यावर गंभीर आरोप केले. घरगुती हिंसाचारासारखे गंभीर आरोप लिएंडर याच्यावर करण्यात आले.
रिया हिच्याशिवाय टेनिसपटू लिएंडर पेस यांचं अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आलं. अभिनेत्री महिमा चौधरी हिला देखील टेनिसपटू लिएंडर पेस यांनी डेट केलं आहे. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं. रिया आता मुलीसोबत आयुष्य जगत आहे.
रिया सोशल मीडियावर रिया कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रिया कामय स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.