AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतिहासाचा अपमान का? ‘राजा शिवाजी’मधील वाघ नखांच्या सीनवरून टीका; अखेर रितेशनेच दिलं उत्तर

रितेश देशमुखच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपट 'राजा शिवाजी'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. परंतु या ट्रेलरमधील एका दृश्यावरून नेटकऱ्यांने टीका केली आहे. या टीकेला आता रितेशनेच उत्तर दिलं आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या..

इतिहासाचा अपमान का? 'राजा शिवाजी'मधील वाघ नखांच्या सीनवरून टीका; अखेर रितेशनेच दिलं उत्तर
रितेश देशमुख (राजा शिवाजी चित्रपट)Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 23, 2026 | 8:25 AM
Share

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट अभिनेता रितेश देशमुखचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्यावर सर्वांनीच भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन, निर्मिती अशा सर्व जबाबदाऱ्या रितेशनेच सांभाळल्या आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिकासुद्धा त्याने साकारली आहे. ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परंतु त्यातल्या एका सीनवर एका नेटकऱ्याने आक्षेप नोंदवला आहे. या सीनचा उल्लेख करत संबंधित नेटकऱ्याने रितेशवर टीका केली आहे. त्यावर खुद्द रितेशनेच उत्तर दिलं आहे. ट्रेलरमधील संजय दत्त आणि रितेश यांच्यातला हा सीन आहे.

एका युजरने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरमधील कथित ऐतिहासिक चुकांवरून रितेशवर टीका केली आहे. त्याने लिहिलं, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानला वाघ नख दाखवलं होतं का? अफजलने महाराजांवर हल्ला केल्यानंतरच वाघ नख समोर आलं होतं. रितेशजी तुम्ही महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला का बदलत आहात?’ दुसऱ्या एका पोस्टमध्ये युजरने ट्रेलरमधील त्या दृश्याचा स्क्रीनशॉटसुद्धा जोडला आहे. त्यात पुढे लिहिलं, ‘रितेश देशमुखच्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हल्ल्यापूर्वीच अफजल खानाला उघडपणे वाघ नख दाखवताना दिसतात. ही एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे की वाघ नख लपवून ठेवण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलच्या हल्ल्यानंतरच त्याचा वापर केला होता. रितेशजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची, वारशाची, अभिमानाची हेराफेरी आणि अपमान का करत आहात?’

रितेशचं उत्तर-

संबंधित युजरच्या या प्रश्नांवर खुद्द रितेशनेच उत्तर दिलं आहे. ‘आदरणीय सर, कृपया 1 मे रोजी हा चित्रपट नक्की बघा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर या चित्रपटातच आहे. मला आशा आहे की तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत या चित्रपटाचा आनंद घ्याल. जय शिवराय!’ मात्र रितेशच्या या उत्तरावर युजरला खात्री पटली नाही. त्याने पुढे रितेशला म्हटलं, ‘म्हणजे सत्य चित्रपटाच्या आत आहे? उत्तरांसाठी चित्रपट पहा, हे काल्पनिक कथांसाठी दिलेलं स्पष्टीकरण ठीक आहे. पण इतिहासासाठी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना चित्रित करताना ट्रेलरनेच प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. प्रश्न निर्माण होता कामा नये. ही रंजक स्ट्रॅटेजी आहे, संशयाचं मार्केटिंग करा आणि त्यानंतर स्पष्टीकरण विका.’

‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, विद्या बालन, भाग्यश्री, बोमन इराणी, फरदीन खान, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर अशी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील तगडी स्टारकास्ट पहायला मिळतेय.

Follow Us
500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Jarnage Viral Audio Clip : 500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या..
Pankaj Bhoyar : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या आरोपांमागचं सत्य लवकरच समोर येणार?
तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू...; प्रवीण दरेकरांचा सूचक इशारा
Pravin Darekar On Ramdas Kadam : तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू....; प्रवीण दरेकरांचा रामदास कदमांना सूचक इशारा
मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; AQI तब्बल....
Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; दादर चौपाटीवर दृश्यमानता घटली, AQI तब्बल....
जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल
Mangesh Sasane : मनोज जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल, नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंना तुम्हीच मोठं केलं ना, मग आता बाजूला का करता?
Chandrakant Khaire : मनोज जरांगेंना तुम्हीच मोठं केलं ना, मग आता बाजूला का करता? चंद्रकांत खैरेंचा रोख नेमका कोणाकडे?
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?