पतीच्या ‘बॉडीपार्ट’वर अभिनेत्रीची जाहीर कमेंट; भडकले नेटकरी, म्हणाले ‘संस्कार कुठेत?’

अभिनेत्री रुबिना दिलैकने 'पती, पत्नी और पंगा' या शोमध्ये अभिनव शुक्लाच्या बॉडीपार्टवर कमेंट केली. यावरून नेटकरी तिला चांगलंच ट्रोल करत आहेत. आता संस्कार कुठे गेले, असा प्रश्न तिला विचारला जात आहे.

पतीच्या बॉडीपार्टवर अभिनेत्रीची जाहीर कमेंट; भडकले नेटकरी, म्हणाले संस्कार कुठेत?
Rubina Dilaik and Abhinav Shukla
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 14, 2025 | 11:53 AM

रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. परंतु नुकत्याच एका कार्यक्रमात रुबिनाला पतीचं कौतुक करणं चांगलंच महागात पडलंय. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये ती जाहीरपणे पतीच्या बॉडीपार्टवर कमेंट करताना दिसतेय. रुबिना आणि अभिनवने ‘पती-पत्नी और पंगा’ या शोमध्ये भाग घेतला आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील काही विवाहित जोड्या या शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. या शोमधील एका टास्कदरम्यान रुबिनाला विचारण्यात आलं होतं की, तिला तिच्या पतीची कोणती गोष्ट सर्वाधिक आवडते?

या प्रश्नाचं उत्तर रुबिनाने जे दिलं, ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पाटीवर एका इमोजीचं चित्र काढून तिने पतीची कोणती गोष्ट आवडते, या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. हा इमोजी पार्श्वभागाला (Hip) दर्शवणारा होता. रुबिना म्हणाली, “मला त्याचा पार्श्वभाग आणि हिप खूप आवडतं. तो फिट शर्टसोबत कार्गो पँट घालायचा, तेव्हा त्याचा लूक आणखी खुलून दिसायचा. त्या लूककडे मी खूप आकर्षित झाले होते.”

रुबिनाने जाहीरपणे दिलेलं हे उत्तर काही लोकांना अजिबात आवडलं नाही. अनेकांनी त्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे रुबिनाचं उत्तर ऐकून अभिनवसुद्धा चकीत झाला होता. तो सुद्धा डोळे फिरवून प्रतिक्रिया देतो. रुबिनाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. पतीच्या प्रायव्हेट पार्टबद्दल तिने अशी जाहीर प्रतिक्रिया देणं अनेकांना पसंत पडलं नाही. अशीच प्रतिक्रिया जर अभिनवने रुबिनाबद्दल दिली असती तर, आता कुठे गेले संस्कार, असा सवालही काहींनी केला आहे.

रुबिनाने 21 जून 2018 रोजी अभिनेता अभिनव शुक्लाशी लग्न केलं. या दोघांनी ‘बिग बॉस 14’मध्ये एकत्र भाग घेतला होता. ‘पती पत्नी और पंगा’ या शोमध्ये हिना खान- रॉकी जैस्वाल, रुबिना दिलैक- अभिनव शुक्ला, अविका गौर आणि मिलिंद चंदवानी, डेबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी, स्वरा भास्कर आणि फहाद अहमद, गीता फोगट आणि पवन कुमार या जोडप्यांनी भाग घेतला आहे. या शोच्या माध्यमातून सेलिब्रिटी जोडप्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे होत आहेत.