अनुष्काचे अहो आणि माझे…विराट कोहलीच्या प्रेमात आकंठ बुडालीये मराठी अभिनेत्री, पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

Marathi Actress Post : मराठी अभिनेत्री विराट कोहलीच्या प्रेमात आकंठ बुडाली असून तिनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

| Updated on: Nov 05, 2026 | 5:51 PM
1 / 5
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि चाहत्यांचा लाडका क्रिकेटपटू विराट कोहली याचा आज वाढदिवस असून विराटच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि चाहत्यांचा लाडका क्रिकेटपटू विराट कोहली याचा आज वाढदिवस असून विराटच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

2 / 5

क्रिकेटप्रेमींसह मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्रीनं विराटसाठी केलेली खास पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये तिनं विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचाही उल्लेख केला आहे.

3 / 5

ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधव आहे. रुचिरा विराट कोहलीची मोठी चाहती असून त्याच्याविषयीचं तिचं प्रेम आणि कौतुक तिने सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे.

4 / 5

रुचिरानं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, 'गणितातील π (Pi) ची किंमत ही कॉन्स्टंट असते. पण, मी म्हणते माझं तुझ्यासाठी असणारं प्रेम हे कॉन्स्टंट आहे. म्हणूनच π (Pi) = माझं तुझ्यासाठी असणारं प्रेम!'

5 / 5

'हॅपी बर्थडे चिकुंद्रे बाहुबली की अमरेंद्र कोहली म्हणू... अनुष्काचे अहो आणि माझे साहो! ज्या प्रकारे तू मैदानावर येतोस, ज्याप्रकारे तू खेळतोस, ज्याप्रकारे तू मॅच संपवतोस आणि ज्याप्रकारे तू अनुष्काला मिठी मारतोस...खूप प्रेम. सेन्च्युरीची वाट पाहत आहोत. आम्हाला काही घाई नाही.' असं रुचिरानं शेवटी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us