AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत 36 मुस्लिम नेत्यांचा विजय, बाबा वेंगा आणि नास्त्रेदमसची भविष्यवाणी खरी होणार?

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत 36 मुस्लिम नेते विजयी झाले आहेत, ज्यात पहिल्यांदाच मुस्लिम सिनेटरचा समावेश आहे. या विजयामुळे बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांनी अनेक वर्षांपूर्वी केलेल्या मुस्लिम वर्चस्वाच्या भविष्यवाणीची जगभर चर्चा सुरू झाली आहे. ही भविष्यवाणी खरी ठरणार का, याबाबत राजकीय विश्लेषक आणि सामान्य नागरिकही विचार करत आहेत.

अमेरिकेत 36 मुस्लिम नेत्यांचा विजय, बाबा वेंगा आणि नास्त्रेदमसची भविष्यवाणी खरी होणार?
Baba VangaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 5:50 PM
Share

अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकीच्या निकालाने डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त धक्का बसला आहे. राजकीय विश्लेषक आता या निकालाचे वेगवेगळे अर्थ काढत आहेत. पण यापेक्षा एक वेगळी भविष्यवाणी समोर आली आहे. बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांनी काही दशकांपूर्वी केलेली ही भविष्यवाणी केली होती. या दोन्ही भविष्यवेत्त्यांनी आजवर केलेल्या बहुतेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांची ही भविष्यवाणीही खरी ठरणार का? अशी चर्चा आता जगभर सुरू झाली आहे.

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार 2042 आणि 2043 पर्यंत अमेरिकासहीत यूरोपात मुस्लिमांचं वर्चस्व वाढणार आहे. बाबा वेंगांच्या या भविष्यवाणीला अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीशी जोडून पाहिलं जात आहे. कारण अमेरिकेच्या निवडणुकीत 36 मुस्लिम प्रतिनिधी निवडून आले आहेत. या निवडणुकीत पहिल्यांदाच एक मुस्लिम सुद्धा सिनेटर म्हणून निवडून आला आहे. अब्दुल अल सैयद असं या मुस्लिम नेत्याचं नाव आहे. सैयद हे परिवर्तनवादी विचाराचे असून त्यांचे भारताशीही खास कनेक्शन आहे.

जॉन होग काय म्हणाला?

बाबा वेंगांप्रमाणेच अमेरिकेचा नास्त्रेदमस म्हणून ओळख असलेल्या जॉन होग यांचीही भविष्यवाणी समोर आली आहे. एक असं युद्ध होईल ते 27 वर्ष चालेल. या युद्धाची सुरुवात पश्चिम आशिया आणि मीडल ईस्टपासून होईल. त्यामुळे या युद्धात अमेरिका आणि यूरोपही होरपळून निघतील. त्यामुळे अमेरिकेचा वैश्विक दबदबा संपुष्टात येईल, असं भाकीतच जॉन होग यांनी वर्तवलं होतं. त्यात 2027 आणि 2028 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. कारण युद्धाची ठिणगी याच वर्षात पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

नास्त्रेदमस यांनीही एक भविष्यवाणी केली होती. त्यांच्या ‘लेस प्रोफेटिज’ या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार 2242 ते 2243 च्या दरम्यान मोठं युद्ध होईल. या युद्धात इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मीयांमध्ये मोठा संघर्ष होईल. या युद्धामुळे अमेरिकेला अधिक फटका बसेल. अमेरिकेच्या अनेक शहरांवर आधुनिक शस्त्रांनी हल्ला केला जाईल, असं नास्त्रेदमस यांनी भविष्य वर्तवलेलं आहे.

जगावर मुस्लिमांचं राज्य?

बाबा वेंगा यांची एक भविष्यवाणी अनेकदा व्हायरल झाली आहे. बाबा वेंगांच्या भविष्यवाणीनुसार, 2043 पर्यंत यूरोपातील 44 देशात इस्लामिक शासकांचं राज्य येईल. हळूहळू अमेरिका सारख्या मोठ्या देशात आणि नंतर हळूहळू संपूर्ण जगात मुस्लिम शासकांचं राज्य होताना दिसेल. आता अमेरिकेच्या निवडणुकीत झालेल्या फेरबदलामुळे बाबा वेंगा यांची भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

याशिवाय बाबा वेंगा यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. 2033 मध्ये हवामानातील बदलामुळे समुद्रातील पाण्याचा स्तर वाढणार आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. तर, 2028 मध्ये मनुष्य शुक्र ग्रहावर जाण्याची तयारी करेल आणि त्यात त्याला यश मिळेल, असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर..
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर काही...
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Gokul : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर