AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 नोव्हेंबरपर्यंत 5 राशींची चांदीच चांदी! वक्री शुक्र देणार भरभरून आर्थिक लाभ

शुक्राच्या वक्री चालीचा पुढील ११ दिवस काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ज्योतिषीय गणनेनुसार, या काळात ५ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासह धन लाभाचे योग निर्माण होतील. कोणत्या आहेत या राशी, जाणून घेऊया.

14 नोव्हेंबरपर्यंत 5 राशींची चांदीच चांदी! वक्री शुक्र देणार भरभरून आर्थिक लाभ
Shukra vakri
| Edited By: | Updated on: Nov 05, 2026 | 5:32 PM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला सुख, संपत्ती, ऐश्वर्य, प्रेम आणि भौतिक सुखांचा कारक मानले जाते. सध्या शुक्र वक्री अवस्थेत असून, १४ नोव्हेंबरपर्यंत त्याची ही चाल कायम राहणार आहे. शुक्राच्या या वक्री चालीचा पुढील ११ दिवस पाच राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. या काळात काहींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासोबतच नोकरी, व्यवसाय आणि नातेसंबंधांमधील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत या ५ राशी आणि त्यांच्यासाठी हा काळ कसा असेल, जाणून घेऊया.

वृषभ

शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी असल्याने या राशीच्या लोकांना त्याच्या वक्री चालीचा चांगला फायदा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामात प्रगतीची संधी मिळेल, तर एखादी चांगली नोकरीची ऑफरही येऊ शकते. व्यावसायिकांना सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. वैयक्तिक नात्यांमधील मतभेदही दूर होण्यास मदत होईल. मात्र, या काळात घाईघाईने कुठेही पैसे गुंतवू नका आणि आर्थिक जोखीम घेणे टाळा.

मिथुन

या राशीच्या लोकांचा कल सुखसोयी आणि चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्याकडे वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. सहकाऱ्यांसोबत काही मतभेद असतील, तर ते संवादातून सोडवण्याचा प्रयत्न करा. खर्च करताना बजेटचे भान ठेवा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. काही जणांना पदोन्नतीची संधीही मिळू शकते. कामात लक्ष लागेल आणि व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल जाणवतील. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक नात्यांमध्येही सुधारणा होईल. जुने गैरसमज दूर करण्यासाठी मोकळेपणाने संवाद साधा. व्यावसायिकांना जुन्या प्रकल्पातून फायदा मिळण्याची शक्यता आहे.

सिंह

शुक्राच्या वक्री चालीचा सिंह राशीच्या लोकांच्या करिअरवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. कामाचा ताण कमी होऊन प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते. तर सध्याच्या नोकरीतही दिलासा मिळू शकतो. व्यावसायिकांसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. कुटुंबातील आणि जवळच्या व्यक्तींसोबतचे संबंध अधिक दृढ होतील.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी पुढील ११ दिवस प्रगतीचे ठरू शकतात. नोकरीशी संबंधित कामांमध्ये सुधारणा होईल आणि रखडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. परदेशाशी संबंधित कामातूनही फायदा मिळू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत. मात्र, पैशांशी संबंधित कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. विनाकारण नकारात्मक विचार करत बसणे टाळा.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर..
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर काही...
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Gokul : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर