Ruchita Jadhav : लग्न हा एक जुगार, मला हुकुमाचा एक्का भेटला…लग्नाबद्दल मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य

Ruchita Jadhav On Marriage : मराठी अभिनेत्री रुचिता जाधवनं एका मुलाखतीत लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

Ruchita Jadhav : लग्न हा एक जुगार, मला हुकुमाचा एक्का भेटला...लग्नाबद्दल मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य
| Updated on: Nov 03, 2026 | 7:20 PM

मराठी अभिनेत्री रुचिता जाधव नुकत्याच एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीनं मुलाखतीदरम्यान तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं. अशाच एका जुन्या मुलाखतीतही अभिनेत्रीनं तिच्या अरेंज मॅरेजबद्दल भाष्य केलेलं. ‘लग्न म्हणजे जुगार‘ असं अभिनेत्री म्हणाली होती. अरेंज मॅरेजचा किस्सा सांगताना रुचिता म्हणालेली की, ‘मी एका राजकीय घरात लहानाची मोठी झाले. घरी सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टींसाठी मोकळीक होती, कोणतीही बंधनं नव्हती. करिअर निवडीसाठी स्वातंत्र्य होतं. फक्त लग्न करताना मुलगा घरचे शोधणार हे मात्र नक्की होतं. त्यामुळं प्रेमात पडूनही काही होणार नाही, हे माहिती होतं. त्याप्रमाणे मी अरेंज मॅरेज केलं. लग्नासाठी हे ७२ वं स्थळ होतं.’

लग्नाबद्दल काय म्हणाली रुचिता जाधव?

Loading...

मॅट्रिमोनीवर नोंदणी केली होती. त्यावर दोघांचेही प्रोफाइल एकमेकांना दिसले, त्यातून ओळख झाली. यानंतर आनंदनं मला एकदा फोन केला होता, की तुला लग्न करायचं नसेल, घरचे जबरदस्ती करत असतील तर सांग, मी नंतर कॉल नाही करणार…पण तसं काही नव्हतं, त्यामुळे मी त्याला आपण बोलू शकतो असं म्हटलं. या दोघांमध्ये संवाद सुरू झाला. जवळजवळ ६ ते ७ महिने एकमेकांना समजून घेतल्यानंतर, डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी लग्न करण्याचा पक्का निर्णय घेतला. यानंतर लग्न झालं, लग्नानंतर एकमेकांच्या प्रेमात पडलो.

अरेंज मॅरेज करताना भीती वाटली नाही का? असं विचारलं असता रुचिता म्हणाली की, ‘लग्न हा एक जुगार असतो. मला माझ्या आयुष्यात हुकुमाचा एक्का भेटला आहे, मी जिंकलेय, असं मला वाटतं.’ ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत रुचिता जाधव बोलत होती.

 

लग्नानंतर रुचिता जाधवनं कुटुंबाला प्राधान्य देण्याचं ठरवलं असून, सासरचे पण तिला सपोर्ट करतात, असंही अभिनेत्री म्हणाली. दरम्यान, रुचितानं रिअल इस्टेट क्षेत्रातील उद्योगपती आनंद माने यांच्याशी लग्नगाठ बांधली. आता अभिनेत्रीदेखील त्यांच्या बिझनेसमध्ये सक्रिय झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us