
मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याची ओळख आहे. सचिन याची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. सचिनला एकदा तरी भेटावं असं प्रत्येक चाहत्यांचं स्वप्न असतं. नुकताच रॅपर आणि ‘बिग बॉस १६’ विजेता एमसी स्टॅन आणि सचिन तेंडुकलर यांची भेटी झाली. भेटी दरम्यान दोघांमध्ये क्रिकेटचा सामना देखील रंगला आहे. एमसी स्टॅन आणि सचिन तेंडुलकर यांचा क्रिकेट खेळताना एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल गोत आहे. खुद्द एमसी स्टॅन याने सचिन तेंडुलकर याच्यासोबत खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र एमसी स्टॅन आणि सचिन तेंडुलकर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
नुकताच, एमसी स्टॅन याने इन्स्टाग्रामवर सचिन तेंडुलकर याच्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहे. शिवाय दोघांमध्ये रंगलेला क्रिकेटचा सामना चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये सचिन फलंदाजी करत आहे तर, एमसी स्टॅन गोलंदाजी करताना दिसत आहे. चाहत्यांनी देखील दोघांच्या व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
एमसी स्टॅनने सचिन तेंडुलकर याच्यासोबत व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘महापुरुष सचिन तेंडुलकर यांच्यासोबत गोलंदाजी… क्रिकेटचा देव…. आभारी आहे… हक से!!!’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र एमसी स्टॅन याच्या सोशल मीडियापोस्टची चर्चा रंगत आहे.
सचिन तेंडुलकर जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. फलंदाजी आणि यशामुळे सचिनला क्रिकेटचा देव म्हटलं जातं. २०१३ साली वेस्ट इंडिजकडून कसोटी मालिका जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरने क्रिकेटला अलविदा म्हटलं. सचिनने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आतापर्यंत १०० शतके ठोकली आहेत.
रॅपर एमसी स्टॅन याच्याबद्दल सांगायचं झालं तर, एमसी स्टॅन पुण्यातील राहणारा आहे. एमसी स्टॅन स्वतःची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कलाविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली.
शोमध्ये मित्रांच्या मदतीने आणि जिद्दीने एमसी स्टॅन याने स्वतःचं स्थान भक्कम केलं. शोमध्ये एमसी स्टॅन याने अनेक चढ-उतार पाहिले. शोमध्ये एमसी स्टॅन हसला, निराश झाला… पण टॉप ५ पर्यंत जाण्यासाठी एमसी स्टॅन याने पूर्ण प्रयत्न केलं आणि बिग बॉस १६ ची ट्ऱॉफी आपल्या नावावर केली. विजेता म्हणून एमसी स्टॅन याला ३१ लाख ८० हजार रुपये आणि एका कार मिळाली आहे. सध्या एमसी स्टॅन तुफान चर्चेत आहे. (mc stan net worth)