
Sai Tamhankar: घायाळ अदांनी चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सईच्या तिचं खासगी आयुष्य कायम गुपित ठेवते. पण आता समोर आलेल्या एका पोस्टमुळे सईच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सांगायचं झालं तर, सई गेल्या अनेक वर्षांपासून निर्माता अनिश जोग याला डेट करत असल्याची चर्चा होती. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण गेल्या काही दिवसांपासून एकाही फोटोमध्ये अनिश आणि सई एकत्र दिसले नाहीत.
अशात सई हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने सिंगल असल्याचं सांगितलं आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘मी पुन्हा सिंगल आहे. पण ही स्वतःची माझी पसंती नाही. ही फक्त एक निवड आहे.’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सई हिने क्रिप्टिक पोस्ट केल्यामुळे चाहत्यांमध्ये देखील अनेक चर्चा रंगल्या आहे. शिवाय अभिनेत्रीने #truestory याचा अर्थ खरी कहाणी.. असा हॅशटॅग देखील वापरला आहे… पण रिलेशनशिप आणि खासगी आयुष्यावर सई हिने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
सांगायचं झालं तर, सई हिने अनिश याच्यासोबत अनेक फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पण आता अभिनेत्रीने अनिश याच्यासोबत असलेले सर्व फोटो डिलिट केल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे सई आणि अनिश यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.
सई हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘मीमी’, ‘दुनियादारी’, ‘तू ही रे’, ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’ अशा अनेक एकापेक्षा एक सिनेमात वेग-वेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर करणारी अभनेत्री सई ताम्हणकर कायम चर्चेत असते.
अनिश जोग याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो एक चित्रपट निर्माता आहे. अनिश याने आतापर्यंत ‘टाईमप्लीज’, ‘व्हायझेड’, ‘मुरांबा’, ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’ या सिनेमांची निर्मिती केली आहे. सई आणि अनिश एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. शिवाय दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.