Saif Ali Khan : आम्ही एकत्र बाईक चालवायचो आणि दर काही मिनिटांनी…सैफ अली खाननं सांगितला करीना कपूरचा रोमँटिक किस्सा
Saif Ali Khan On Kareena Kapoor : सैफ अली खाननं एका कार्यक्रमात करीना कपूरसोबतचा बाईक राईडचा खास किस्सा सांगितला आहे.

अक्षय कुमार आणि सैफ अली खान ‘हैवान’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आले होते. शो दरम्यान, मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्याशी संवाद साधला. मात्र, नेहमीप्रमाणे, वेळ वाचवण्यासाठी एडिटिंग करताना काही क्लिप्स कापण्यात आल्या. निर्मात्यांनी नुकताच केबीसीचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ प्रदर्शित केला आहे, ज्यामध्ये सैफ अली खान करीना कपूर खानसोबतच्या बाईक राईडचा आपला अनुभव सांगत आहे.
सैफ अली खाननं सांगितला किस्सा
व्हिडिओमध्ये, सैफ अली खान सांगतो की, जेव्हा तो पहिल्यांदा करीना कपूरसोबत बाईक राईडवर गेला होता, तेव्हा ती दर काही मिनिटांनी ओरडायची आणि तिची नखं त्याच्या चेहऱ्यावर मारायची. नंतर, सैफ अली खानच्या लक्षात आलं की करीनाला बाईक चालवणं आवडत नाही. ती त्याच्यासोबत बाईक राईडवर फक्त यासाठी आली होती कारण ती त्याच्या प्रेमात पडली होती आणि तिला त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता.
सैफ अली खाननं करीनासोबतच्या शूटिंगच्या वेळचा एक किस्सा सांगितला. सैफ म्हणाला, ‘सुरुवातीला, जेव्हा करीना आणि मी जास्त बोलत नव्हतो. आम्ही फक्त एकमेकांशी चांगले वागत होतो, तेव्हा कोणीतरी म्हणालं, ‘तू तिला बाईक राईडसाठी का विचारत नाहीस?’ तिला बाईक खूप आवडतात.’ मी एक बाईक भाड्यानं घेतली आणि शूटिंग चालू असताना हेडफोन लावून लडाखच्या रस्त्यांवर ती चालवायचो.’
सैफ म्हणाला, ‘मी करीनाला विचारलं, ‘तू माझ्यासोबत बाईक राईडवर येशील का?’ आणि ती म्हणाली, ‘का नाही? मला बाईक्स खूप आवडतात.’ आम्ही एकत्र बाईक चालवायचो, आणि दर काही मिनिटांनी, ती माझ्यात नखं खुपसून म्हणायची, ‘थांब, थांब, थांब.’ सैफनं सांगितलं की, तो बाईक थांबवायचा आणि मग पुन्हा चालवायला सुरुवात करायचा. शेवटी करीना म्हणाली, ‘मला बाईक राईडचा तिरस्कार आहे.’ नंतर लक्षात आलं की, करीना त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी फक्त बाईक राईडला जायची, असंही सैफ म्हणाला.