AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tandav | आदिपुरूषवर माफी मागणारा सैफ आता आणखी एका वादात? पाहा संपूर्ण रिपोर्ट

प्रत्येकजण आतुरतेने सैफ अली खानची  (Saif Ali Khan) वेब सीरीज 'तांडव' ची वाट पाहत आहे.

Tandav | आदिपुरूषवर माफी मागणारा सैफ आता आणखी एका वादात? पाहा संपूर्ण रिपोर्ट
| Edited By: | Updated on: Dec 19, 2020 | 2:34 PM
Share

मुंबई : प्रत्येकजण आतुरतेने सैफ अली खानची  (Saif Ali Khan) वेब सीरीज ‘तांडव’ ची वाट पाहत आहे. या वेब सीरीजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच एका वक्तव्यामुळे सैफ अली खीन वादाच्या भोवऱ्यात सापडला होता, तेव्हा हा टीझर प्रदर्शित झाला होता. मात्र, या सर्व परिस्थितीत आता असे वाटत आहे की, तांडव वेब सीरीजमुळे सैफ अली खान पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. (Saif Ali Khan’s Web Series is likely to be embroiled in controversy)

कारण या वेब सीरीजमध्ये तो उत्तर भारतातील एका राजकीय नेत्याची भूमिका साकारत आहे आणि स्पॉटबॉयच्या म्हणण्यानुसार ही वेब सीरिज एका राजकीय नेत्याच्या आयुष्यावर आधारित आहे. पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खान म्हणाला की, डार्क कैरेक्टर करायला मला आवडते कारण त्यात फ्लेक्सिबल होण्याची संधी मिळते. या वेब सीरीजमध्ये, राजकारणी सत्तेसाठी काय करू शकतात, सत्तेसाठी कोणत्या पातळीला जाऊ जातात. आणि सत्ता मिळवण्यासाठी लोकांचा कसा वापर करतात हे दाखवण्यात आले आहे. यामुळेच सैफ अली खानची ही वेब सीरीज वादात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. सैफ अली खान अशा प्रकारच्या वादात अडकण्याची पहिली वेळ नाही. यापूर्वी आदिपुरुषवर केलेल्या वक्तव्यावरून मोठा हंगामा झाला होता. त्यावेळी सैफ अली खानवर मोठ्या प्रमाणात टिकाही झाली होती.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. सैफ अली खान 2022 साली प्रदर्शित होणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट रामायणावर आधारीत आहे. दरम्यान, ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत सैफने सीताहरण संबंधित केलेल्या टिप्पणीमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटात हिंदूंच्या भावनांना दुखवण्याचा प्रयत्न केला गेला तर ते भाजप सहन करणार नाही, असा इशारा भाजप नेते राम कदम यांनी दिला होता.

सैफ नेमकं काय म्हणाला?

“एका राक्षस राजाची भूमिका साकारणं हे खूप उत्साहिक आहे. मात्र ही भूमिका तितकी क्रूर नाही. आम्ही या भूमिकेला भरपूर मनोरंजनात्मक पद्धतीने बनवणार आहोत. सीतेचं अपहरण आणि रामासोबत झालेलं युद्ध हे सूड घेण्याच्या ईष्येने झालं असल्याचं आम्ही दाखवणार आहोत. लक्ष्मनने रावणाची बहिण सुपर्नकाचं नाक कापलं होतं. त्याचाच सूड उगवण्यासाठी सीतेचं अपहरण करण्यात आलं आणि रामासोबत युद्ध झालं, असं आम्ही दाखवणार आहोत”, असं वक्तव्य सैफ अली खानने केले होते.

संबंधित बातम्या : 

हृतिक रोशन शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात दिसण्याची शक्यता!

बॉलीवुडमधून मोठी बातमी, ड्रग्जचा डेटा मिळाला?

(Saif Ali Khan’s Web Series is likely to be embroiled in controversy)

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.