कृष्णराज महाडिकांसोबत ‘तो’ फोटो, रिंकू राजगुरुने पहिल्यांदा सोडलं मौन

Rinku Rajguru: रिंकू कोल्हापूरची सून होणार का...? कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' व्हायरल फोटोवर पहिल्यांदा रिंकूने सोडलं मौन, म्हणाली, 'माझं लग्न...', सध्या सर्वत्र रिंकू राजगुरु हिच्या वक्तव्याची चर्चा...

कृष्णराज महाडिकांसोबत तो फोटो, रिंकू राजगुरुने पहिल्यांदा सोडलं मौन
फाईल फोटो
| Updated on: Aug 30, 2025 | 8:09 AM

Rinku Rajguru: ‘सैराट’ सिनेमातून एका रात्रीत स्टार झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु आता कायम कोणत्या न कोण्त्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील रिंकू हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. चाहत्यांची लाडकी असल्यामुळे अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल देखील होत असतात. ज्यामुळे चर्चांना उधाण येतं. सांगायचं झालं तर, रिंकू हिचं नाव देखील अनेकांसोबत जोडण्यात आलं.. पण अभिनेत्रीने कधीच तिच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केलं आहे. पण आता पहिल्यांदा रिंकूने तिच्या खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

काही महिन्यांपूर्वी रिंकू राजगुरु हिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांच्यासोबत रिंकू हिचा एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात काढलेल्या या फोटोमुळे चर्चांना देखील उधाण आलं. रिंकू कोल्हापूरची सून होणार का…? असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून विचारण्यात आले.

आता यावर खुद्द रिंकू हिने मौन सोडलं आहे. कृष्णराज महाडिक यांच्यासोबत व्हायरल झालेल्या फोटोवर पहिल्यांदा रिंकूने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘खरं सांगायचं झालं तर तो फोटो मी शेअर केलाच नव्हता… आपण कुठेही जातो तेव्हा फोटो काढले जातात. त्यांच्या टीमने तो फोटो पोस्ट केला होता आणि असं हे नेहमीच घडणार आहे. माझ्यासाठी आता हे काही नवीन नाही. त्यामुळे त्याची इतकी चर्चा करण्याचं देखील काही कारण नाही…’ असं रिंकू हिने एका मुलाखतीत सांगितलं.

पुढे लग्नाबद्दल रिंकू म्हणाली, ‘माझं लग्न ठरेल तेव्हा मी स्वतः सर्वांना सांगेल… की मी आता लग्न करत आहे. लग्नाच्या चर्चा अनेकदा होतात, त्यामुळे अशा चर्चांचा आता मला त्रास होत नाही…’ असं देखील रिंकू म्हणाली. सध्या सर्वत्र रिंकू हिची चर्चा रंगली आहे.

व्हायरल फोटोवर काय म्हणाले होते कृष्णराज महाडिक?

फोटो व्हायरल झाल्यानंतर कृष्णराज महाडिक यांनी देखील स्पष्टीकरण दिलं होतं. ‘आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत… सगळ्यांना वाटतं असं काहीही नाही…’ तेव्हा सोशल मीडियावर फक्त आणि फक्त दोघांची नात्याची चर्चा रंगली आहे. पण कृष्णराज महाडिक यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम लागला.