AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्या घरातली मुलगी, बहीण असती तर..; स्मृती – पलाशच्या लग्नाबद्दल होणाऱ्या चर्चांबाबत सलील कुलकर्णी स्पष्टच म्हणाले..

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नावरून होणाऱ्या विविध चर्चांवर आता सलील कुलकर्णी यांनी आपलं मत मांडलं आहे. एवढी कसली घाई आहे बातम्या पसरवण्याची, असा सवाल त्यांनी केला आहे. स्मृती-पलाशच्या लग्नावरून अनेक अफवा पसरवल्या जात आहेत.

आपल्या घरातली मुलगी, बहीण असती तर..; स्मृती - पलाशच्या लग्नाबद्दल होणाऱ्या चर्चांबाबत सलील कुलकर्णी स्पष्टच म्हणाले..
सलील कुलकर्णी, स्मृती मानधना-पलाश मुच्छलImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 27, 2025 | 9:42 AM
Share

क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न पुढे ढकलल्यापासून विविध चर्चांना उधाण आलं आहे. लग्नाच्या दिवशीच स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यानंतर स्मृतीने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेत इन्स्टाग्रामवरील लग्नासंबंधीचे सर्व फोटो आणि रील काढून टाकले. यादरम्यान कोरिओग्राफर मेरी डिकोस्टासोबत पलाशच्या फ्लर्टिंगचे चॅट्स समोर आले. त्यावरून पलाशने स्मृतीची फसवणूक केली, अशी टीका होऊ लागली. अशा असंख्य चर्चा होत असताना आता प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांचं त्यांचं मोकळं मत मांडलं आहे. स्मृतीच्या जागी आपल्या घरातली मुलगी किंवा बहीण असती, तरी आपण असं बोललो असतो का, असा सवाल त्यांनी केला आहे.

काय म्हणाले सलील कुलकर्णी?

“मित्रमैत्रिणींनो, आपण असे का वागतो? स्मृती मानधनाच्या आयुष्यात जे काही घडलं असेल, ते ती बघेल आणि तिच्या जवळची लोकं बघतील. आपल्या घरातली मुलगी असती, बहीण असती, तर आपण असं बोललो असतो का? काय हौस आहे की सगळ्यांपेक्षा जास्त आपल्याला माहीत आहे, सगळ्यांच्या आधी आपल्याला माहीत आहे हे सांगण्याची? कोणाच्या मृत्यूच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत घाई कसली आहे बातम्या पसरवण्याची, माहिती नसताना वाढवून सांगण्याची? हे काय आहे? थोडंसं दयाळू आणि थोडं समजूतदार बना. आपल्या घरचं कोणी त्याठिकाणी असतं, तर आपण तसं केलं नसतं. तुम्हाला आधी कळलं तर असं कोणतं यश मिळणार आहे? जरा आपापलं बघुयात ना,” असं मत सलील कुलकर्णी यांनी मांडलं आहे.

सलील कुलकर्णी यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तुमचं अगदी बरोबर आहे, स्मृती आपल्या देशाची मुलगी आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘इथे लोकांचं निधन होण्याआधी त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते, तर आणखी काय वेगळी अपेक्षा करणार’, असं मत दुसऱ्या युजरने मांडलंय. आणखी एकाने यात स्मृती-पलाशचीही चूक असल्याचं म्हटलंय. ‘त्यांनी त्यांचं खासगी आयुष्य इतकं सार्वजनिक केलंय आणि सोशल मीडियावर पोस्ट केलंय, तर नेटकरी प्रतिक्रिया देणारच ना’, असं संबंधित युजरने लिहिलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...