Salman Khan : गणपती विसर्जनादरम्यान सलमान खानने वरुण शर्माची घेतली फिरकी, VIDEO पाहून तुम्हीही हसाल

खान कुटुंबियांच्या घरी गणोशोत्सव उत्साहात पार पडला. सलमान खानही त्यात सहभागी झाला होता. पूजा सुरू असताना त्याची आणि अभिनेता वरूण शर्माची झालेली मस्ती कॅमेऱ्यात कैद झाली आणि सर्वांनाच हसू फुटलं.

Salman Khan : गणपती विसर्जनादरम्यान सलमान खानने वरुण शर्माची घेतली फिरकी, VIDEO पाहून तुम्हीही हसाल
| Updated on: Sep 16, 2026 | 3:07 PM

अभिनेता सलमान खान (Salman Khan) नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आणि बिग बॉस 20 मध्ये व्यस्त आहे. मात्र बिझी शेड्युलमधून वेळ काढून तो कुटुंबियांसोबत सण – उत्सव साजरा करतो, सेलिब्रेशनमध्येही सहभागी होतो. सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूमधाम आहे. खान कुटुंबियांच्या घरीदेखील सण उत्साहाने साजरे होतात. नुकताच सलमान हा त्याचा भाऊ सोहेल खानच्या घरच्या गणपती विसर्जन सोहळ्यात सहभागी झाला. यावेळी अभिनेता वरुण शर्मासोबत त्याचा एक मजेशीर क्षण समोर आला. त्या दोघांची मजा व्हिडिओतही कैद झाली आणि सोशल मीडियावरही तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

सलमानचा धाकटा भाऊ, अभिनेता सोहेल खानने यंदा आपल्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती. दीड दिवस पूजा-अर्चना केल्यानंतर 15 सप्टेंबरच्या रात्री गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आलं. या खास प्रसंगी सलमान खानही भावाच्या घरी पोहोचला आणि संपूर्ण कुटुंबासोबत त्याने बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. या सोहळ्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. त्यापैकी एका व्हिडिओमध्ये सलमान खान वरुण शर्मासोबत मजा-मस्करी करताना दिसला.

सलमानने वरुण शर्माची घेतली मजेशीर फिरकी

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपली पाळी येण्याची वाट पाहताना दिसतो. त्याचवेळी त्याच्यापूर्वी वरुण शर्मा बाप्पाचा आशीर्वाद घेताना दिसत होता. वरुणला बराच वेळ प्रार्थना करत होता, मात्र ते पाहून सलमानने त्याची मजेशीरपणे फिरकी घेतली. तो म्हणाला, ‘ आणखी किती विश मागणार? देव जास्त काही देणार नाहीये.’ सलमानचं हे मजेदार बोलणे ऐकून वरुण शर्मासह उपस्थित इतर लोकही हसू लागले. त्यानंतर वरुणने प्रार्थना पूर्ण केली आणि तोही या सोहळ्यात सहभागी झाला.

 

सोहेल खानच्या घरी गणपीतासाठी सलमान आलाच, पण त्यापूर्वी 14 सप्टेंबर रोजी तो मुकेश आणि नीता अंबानी यांच्या घरी, अँटिलियात गणरायाच्या दर्शनासाठी गेला. तिथे काजोलस विकी कौशल, कटरिना कैफ, सचिन तेंडुलकर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, रमबीर कपूर, आलिया भट्ट, वरूण धवन, रणवीर सिंह आणि बॉलिवूडचे इतर अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

सलमानचा आगामी चित्रपट

सलमान खानच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच ‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात चित्रांगदा सिंह हिचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. अपूर्व लाखिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. एवढंच नव्हे तर सलमान खान सध्या दिग्दर्शक वामसी पेडिपल्ली यांच्या आगामी ॲक्शन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव ‘मॉन्स्टर’ असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री नयनताराही सलमानसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच सध्या तो ‘बिग बॉस 20’ देखील होस्ट करतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us